नवी दिल्ली :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान ईनाडू ग्रुपने ( Enadu Group ) स्वातंत्र्य चळवळीतील वीरांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. ईनाडूचे एमडी चे. किरण यांनी या उपक्रमाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. यावेळी मार्गदर्शी चिट फंडच्या एमडी शैलजा आणि रामोजी फिल्म सिटीच्या एमडी विजयेश्वरी यांचीही उपस्थिती ( Ramoji Film City MD Vijayeshwari ) होती. या प्रयत्नाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.
Eenadu Azadi Ka Amrit Mahotsav : ईनाडूच्या विशेष उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक
संपूर्ण देश 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करत असताना, ईनाडू समूहाने ( Enadu Group ) या निमित्ताने एक विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या प्रयत्नाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ईनाडू ग्रुपने स्वातंत्र वीरांवर एक पुस्तक प्रकाशित केले आहे. 'द इम्मोर्टल सागा - इंडियाज स्ट्रगल फॉर फ्रीडम' या पुस्तकाची प्रत पंतप्रधानांना सादर करण्यात आली आहे. पुस्तक सादर करण्यासाठी ईनाडूचे एमडी चि. किरण, मार्गदर्शी चिट फंडच्या एमडी. चि .शैलजा आणि रामोजी फिल्म सिटीच्या एमडी चि . विजयेश्वरी ( Ramoji Film City MD Vijayeshwari ) उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी केले कौतुक :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवया उपक्रमाचा एक भाग म्हणून ईनाडू ग्रुपने स्वातंत्र वीरांवर एक पुस्तक प्रकाशित केले आहे. पंतप्रधानांना हे पुस्तक भेट देण्यात आले यावेळी पंतप्रधानांनी ईनाडू समूहाच्या या प्रयत्नाचे कौतुक केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात असे प्रयत्न होणे गरजेचे आहे, ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच स्वातंत्र्य चळवळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लोकसहभाग आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
ईनाडूचे पाऊल कौतुकास्पद :स्वातंत्र्य चळवळीत अनेक वीरांनी देशाच्या विविध भागात उल्लेखनीय भूमिका बजावल्या, परंतु त्यांच्या योगदानावर फारसे काही लिहिले गेले नाही. अशा वीरांचे योगदान समोर आणण्याची गरज आहे आणि ईनाडूने या दिशेने उचललेले पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारच्या प्रयत्नांचाही विशेष उल्लेख केला, ज्या अंतर्गत देशाच्या विविध भागात 'आदिवासी संग्रहालये' उभारली जात आहेत. या वीरांबद्दल लोकांना सांगण्यासाठी सरकार बरीच पावले उचलत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.