नवी दिल्लीModi Launches PM Vishwakarma Yojana :द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन, एक्स्पो सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पीएम विश्वकर्मा'चे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान पीएम मोदींनी 'पीएम विश्वकर्मा'चे चिन्ह, टॅगलाइन, पोर्टलचं लोकार्पण केलं. द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन, एक्स्पो सेंटर इथं 'पीएम विश्वकर्मा' योजनेच्या शुभारंभावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध कलाकार, कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्रांचं वितरण केलं.
आज मी 'यशोभूमी' योजना देशाच्या प्रत्येक कामगाराला समर्पित करतो, आज विश्वकर्मा जयंती आहे. हा दिवस देशातील कारागीर, कारागीरांना समर्पित आहे. मी विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा देऊ इच्छितो. मला आनंद आहे की आज, मला आमच्या विश्वकर्मा सदस्यांशी जोडण्याची संधी मिळाली. पीएम विश्वकर्मा' योजना आज सुरू करण्यात आली आहे, जी कारागीरांसाठी आशेचा किरण म्हणून उदयास येईल. - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पीएम विश्वकर्मावर 13 हजार कोटी रुपये खर्च :पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण आपल्या विश्वकर्मा भागीदारांना ओळखलं पाहिजं. आमचं सरकार आमच्या विश्वकर्मा भागीदारांच्या विकासासाठी काम करत आहे. या योजनेअंतर्गत विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. सरकार 'पीएम विश्वकर्मा' योजनेवर 13 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. विश्वकर्मा योजनेचं उद्दिष्ट पारंपारिक कारागीरांद्वारे तयार केलेली उत्पादनं तसंच सेवांची गुणवत्ता वाढवणं आहे. ही योजना 1 लाख रुपये (18 महिन्यांच्या परतफेडीसाठी पहिला टप्पा) तर, 2 लाख रुपये (30 महिन्यांच्या परतफेडीसाठी दुसरा टप्पासाठी कर्ज देते. सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे यावर 8 टक्के व्याज सवलत मिळणार आहे. क्रेडिट गॅरंटी फी केंद्र सरकार उचलेल, असं मोदी म्हणाले.
रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार :'वोकल फॉर लोकल' या सरकारच्या व्हिजनवर जोर देत मोदी म्हणाले की, गणेश चतुर्थी, धनत्रयोदशी, दिवाळी या सणांमध्ये लोकांना स्थानिक उत्पादनं खरेदी करण्यास सांगितलंय. यशोभूमीमध्ये परिषदा, प्रदर्शनांचे आयोजन करण्यासाठी संपूर्ण परिसंस्था कार्यरत असणार आहे. यामुळं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. "एकट्या 'यशोभूमी' कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी मिळण्याची अपेक्षा आहे," असे पंतप्रधान म्हणाले.
13 हजार कोटींची मान्यता : 'यशोभूमी द्वारका सेक्टर 25' या नवीन मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनासह यशोभूमीला दिल्ली विमानतळ मेट्रो एक्स्प्रेस लाइनशीही जोडले जाईल. दिल्ली मेट्रो एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईनवरील मेट्रो गाड्यांच्या ऑपरेशनल स्पीडमध्ये 90 ते 120 किलोमीटर प्रति तास वाढ करण्यात येइल अशी माहिती त्यांनी दिलीय. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीनं गेल्या महिन्यात पाच वर्षांसाठी (आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28) 13 हजार कोटी रुपयांच्या 'पीएम विश्वकर्मा' या नवीन केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिली होती. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत, कारागीरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, 5 टक्के सवलतीच्या व्याजदरासह 1 लाख रुपये (पहिला हफ्ता) आणि 2 लाख रुपये (दुसरा टप्पा) पर्यंतचा क्रेडिट प्रदान केला जाईल.
- यांना मिळणार योजनेचा लाभ : या व्यवसायांमध्ये सुतारांचा समावेश आहे. तसंच बोट निर्माता, लोहार, टूलकिट निर्माता, लॉकस्मिथ; सोनार कुंभार शिल्पकार (मूर्तिकर, दगड कोरणारा), दगड फोडणारा; मोची गवंडी टोपली/चटई/झाडू निर्माता/कोयर विणकर; बाहुली आणि खेळणी तयार करणारे, (पारंपारिक), न्हावी आणि शिंपी आदींचा समावेश आहे.
हेही वाचा -
- Narendra Modi Birthday : पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या संस्कृतमध्ये शुभेच्छा, Watch Video
- Anna Hazare Warning Protest : 'अजून म्हातारा झालो नाही'; अण्णा हजारे पुन्हा आक्रमक; आंदोलनाचा इशारा
- Hyderabad CWC Meeting Kharge : '2024 च्या निवडणुकीत भाजपाचा पराभव करणं आमचं ध्येय, CWC बैठकीत भाजपावर प्रहार