महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदीजी तुमच्या सरकारने मला कोणत्याही ऑर्डरशिवार व FIR दाखल न करता 28 तास कोठडीत ठेवले - प्रियंका गांधी - Priyanka Gandhi arrest

लखीमपूर खीरी हिंसा प्रकरणात सर्व विरोधी पक्ष सरकारविरोधात एकवटले आहेत. लखीमपूर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना सीतापूर जिल्ह्यातील हरगाव येथे अटक करण्यात आली आहे.

Priyanka Gandhi
Priyanka Gandhi

By

Published : Oct 5, 2021, 3:44 PM IST

नवी दिल्ली - लखीमपूर खीरी हिंसा प्रकरणात सर्व विरोधी पक्ष सरकारविरोधात एकवटले आहेत. लखीमपूर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना सीतापूर जिल्ह्यातील हरगाव येथे अटक करण्यात आली आहे. यूपी पोलिसांनी प्रियंका गांधींना नजरकैदेत ठेऊन 24 तासांहून अधिक काळ झाला आहे. यावर काँग्रेस केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाली आहे.

पीएम मोदींवर निशाणा साधताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, तुमच्या सरकारने मला कोणत्याही ऑर्डरशिवाय व FIR दाखल न करता मला 28 तास नजरकैदेत ठेवले. मात्र शेतकऱ्यांना चिरडणाऱ्याला अजून का अटक करण्यात आली नाही?

हे ही वाचा -Lakhimpur Kheri Violence : जमावबंदी आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना यूपी पोलिसांकडून अटक

त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधींनीही ट्वीट केले आहे.त्यामध्ये म्हटले आहे, की जिला कोठडीत ठेवले आहे, ती कुणाला घाबरत नाही. ती सच्ची काँग्रेसी आहे, हार मानणार नाही ! सत्याग्रह थांबणार नाही.

प्रियंका गांधींना अटक केल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसकडून संपूर्ण देशात आंदोलन केले जात आहे. प्रियंका गांधींना रविवारी लखीमपूर खीरी जाण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details