महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदी सरकारने गाढ झोपेतून जागे व्हावे- अफगाणिस्तानमधील स्थितीवरून काँग्रेसची बोचरी टीका

काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला म्हणाले, की तालिबान आणि हक्कानी नेटवर्कचे पाकिस्तानमधील आयएसआय, जेईएम, एलईटी, जेयूडी यांच्याबरोबर असलेले संबंध चांगलेच माहित आहेत. आपल्या भू-राजकीय हितांचे संरक्षण करण्यासाठी व जम्मू आणि काश्मीरवर होणाऱ्या परिणामांचा विचार करता पुढे पाहायला हवे.

रणदीप सुरजेवाला
रणदीप सुरजेवाला

By

Published : Aug 16, 2021, 7:04 PM IST

नवी दिल्ली- अफगाणिस्तानमधील स्थिती अत्यंत धोक्याची आहे. अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिक आणि दुतावासामधील अधिकारी देशात सुरक्षित आणण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट बोलावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच पंतप्रधानांनी नवी दिल्ली आणि काबुलबरोबरील भविष्यातील संधीबाबत बोलावे, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, की भारतीय लोकांचे हितसंरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष भक्कपणे पाठीमागे उभा आहे. अफगाणिस्तानमध्ये सरकार कोसळल्यानंतर तालिबानने तिथे कब्जा घेतला आहे. आपल्या सरकारने परिपक्व आणि राजनैतिक प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा आहे. असे असले तरी नरेंद्र मोदी सरकारची शांतता आश्चर्यजनक आहे. तसेच वेदनादायी आणि अत्यंत कुतूहुल वाढविणारी आहे. मोदी सरकारची शांतता ही समजण्यापलीकडे आहे. मोदी सरकारने आपल्या नागरिकांना सुरक्षित आणण्याचे नियोजन नाकारले आहे. हे पदाची जबाबदारी सोडल्यासारखे असून अस्वीकारार्ह आहे.

हेही वाचा-भारतामधील अफगाणिस्तानच्या राजदुत कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक

मोदी सरकार हे देशापासून काहीतरी लपवित असल्याचा समज

पुढे सुरजेवाला म्हणाले, की तालिबान आणि हक्कानी नेटवर्कचे पाकिस्तानमधील आयएसआय, जेईएम, एलईटी, जेयूडी यांच्याबरोबर असलेले संबंध चांगलेच माहित आहेत. आपल्या भू-राजकीय हितांचे संरक्षण करण्यासाठी व जम्मू आणि काश्मीरवर होणाऱ्या परिणामांचा विचार करता पुढे पाहायला हवे. मात्र, मोदी सरकार हे भान नसल्यासारखे अजून कायम राहिले आहे. पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांनी नागरिकांना सुरक्षित आणणे आणि अफगाणिस्तानबरोबर असलेल्या भविष्यातील संबंधाबाबत स्पष्टपणे बोलले पाहिजे. अत्यंत मोक्याच्या क्षणी मोदी सरकारने अनेपेक्षितपणे मौन बाळगले आहे. त्यामुळे मोदी सरकार हे देशापासून काहीतरी लपवित असल्याचा समज तयार होत आहे.

हेही वाचा-... म्हणून तालिबानी दहशतवाद्यांसमोर अफगाणिस्तानच्या सैन्यदलाने मानली हार

अफगाणिस्तानमधील भारतीय नागरिकांचे हितसंरक्षण करावे-

दोहामधील बैठकीत तालिबानबाबत मोदी सरकार काय भूमिका मांडणार, याबाबत अद्याप आम्ही अंधारात आहोत. गाढ झोपेत असलेल्या मोदी सरकारने जागे व्हावे आणि अफगाणिस्तानमधील भारतीय नागरिकांचे हितसंरक्षण करावे. शेजारील देशामध्ये धोकादायक स्थिती असताना प्रश्न कसा सोडविणार आहात, याची माहिती मोदी सरकारने देशाला द्यावी, असेही काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी सांगितले.

हेही वाचा-अनिल देशमुख प्रकरण : कोणतीही कारवाई नाही, याचा अर्थ तपासात स्थगिती नाही- सर्वोच्च न्यायालय

ABOUT THE AUTHOR

...view details