नवी दिल्ली -पाकिस्तानच्या आणि चीनच्या आडमुठीपणामुळे भारताने आता सीमेवरील आपली बाजू बळकट करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय लष्काराची आणखी ताकद वाढणार आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने आज भारत डायनामिक्स लिमिटेडसोबत 1,188 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड लष्काराला 4,960 मिलान-2 टी अँटी-टँक क्षेपणास्त्रांचा पुरवठा करणार आहे. मिलान -2 टी ची निर्मिती फ्रान्सच्या संरक्षण कंपनीच्या परवान्याअंतर्गत बीडीएलद्वारे केली जाते.