डेहराडून (उत्तराखंड): Jio 4G Service: भारतातील शेवटचे आणि सीमावर्ती गाव India last village असलेल्या माना गावात आजपासून 4G सेवा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बद्रीनाथ धाम जवळील माना गावात Jio ची 4G सेवा लाँच केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, चारधाम, हेमकुंड साहिबसह उत्तराखंडमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 4G सेवेचा लाभ यात्रेकरू आणि स्थानिक लोकांना मिळेल. 4G service started in Mana village
वास्तविक, या भागात चांगल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मागणी अनेक दिवसांपासून होती. त्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बद्रीनाथ धामजवळील माना गावात 4G सेवा सुरू केली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देशाच्या सीमेजवळील देशातील शेवटचे गाव बद्रीनाथ धाम आणि माना येथे 4G सेवा सुरू केल्याबद्दल जिओचे कौतुक केले. तसेच, 4G सेवा सुरू करणारा Jio हा पहिला ऑपरेटर बनला आहे, असेही ते म्हणाले.