नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर ( Nirmala Sitharaman Union Budget 2022 ) केला आहे. दीड तास सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. यामध्ये कोरोनादरम्यान महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. मोबाईल फोन, चार्जर, कपडे आदी वस्तू स्वस्त होणार आहे.
मोबाईल होणार स्वस्त
मोबाईल फोन, चार्जरचा ट्रान्सफार्मर व कॅमेरा लेन्सवरील आयात शुल्क घटवण्यात आले आहे. यामुळे मोबाईल फोन चार्जर स्वस्त होणार आहे. त्याचसोबत, देशात निर्माण होणारे मोबाईलही स्वस्त होतील. देशात मोबाईल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.