महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Meghalaya CM : मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या कार्यालयावर दगडफेक, मुख्यमंत्री कार्यालयातच अडकले - मेघालय

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा आंदोलक गटांसोबत बैठक घेत असताना त्यांच्या कार्यालयावर जमावाने दगडफेक केली. सध्या मुख्यमंत्री संगमा आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी मंत्री मार्कुइस एन मारक हे कार्यालयातच अडकलेले आहेत.

mob pelted stones at Meghalaya CM
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा

By

Published : Jul 24, 2023, 10:26 PM IST

Updated : Jul 24, 2023, 10:35 PM IST

शिलॉन्ग : मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या तुरा येथील कार्यालयावर जमावाने सोमवारी दगडफेक केली. यात पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यावेळी त्यांच्या कार्यालयात असलेले संगमा यांना या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही, परंतु सध्या ते त्यांच्या कार्यालयातच अडकले आहेत.

आंदोलक गटांसोबत बैठक घेत असताना घटना घडली : मुख्यमंत्री संगमा उपोषणाला बसलेल्या आंदोलक गटांसोबत बैठक घेत असताना ही घटना घडली. गारो हिल्समध्ये स्थित हे गट तुरा येथे हिवाळी राजधानीची मागणी करत आहेत. 14 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणानंतर, मुख्यमंत्री संगमा सोमवारी या गटांसोबत बैठकीसाठी शिलॉन्गहून तुरा येथे आले होते. मेघालयातील अचिक कॉन्शस होलिस्टिक इंटिग्रेटेड क्रिमा (ACHIK) आणि गारो हिल्स स्टेट मूव्हमेंट कमिटी (GHSMC) हे दोन गट ही मागणी करत आहेत.

पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या : तुरा येथे मुख्यमंत्री आणि गटांमधील बैठक तीन तासांहून अधिक काळ शांततेत सुरू होती. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ऑफीसबाहेर जमाव जमला आणि त्यांनी दगडफेक सुरु केली. त्यानंतर येथील परिस्थिती चिघळली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यानंतर झालेल्या गदारोळात पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. सध्या तुरा येथील मुख्यमंत्री कार्यालयातील परिस्थिती तणावपूर्ण आहे. मुख्यमंत्री संगमा आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी मंत्री मार्कुइस एन मारक हे कार्यालयातच अडकलेले आहे.

आंदोलक गटांना शिलाँगमध्ये चर्चेसाठी बोलावले : बैठकीदरम्यान, संगमा यांनी आंदोलक गटांना शिलाँगमध्ये चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. कॉनराड संगमा यांनी आंदोलकांना हिवाळी राजधानी आणि नोकरीतील आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी भेटण्यास सांगितले आहे. त्यात कॅबिनेट मंत्री आणि इतर संबंधित सहभागी होणार आहेत. ही बैठक 8 किंवा 9 ऑगस्ट रोजी नियोजित गेली गेली आहे.

हेही वाचा :

  1. Manipur Violence : मणिपूर हिंसाचारात महिलांची ढाल; जमावाने जाळली रिकामी घरे, शाळेलाही लावली आग
  2. West Bengal Violence: मणिपूर पाठोपाठ... पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, दोन महिलांना बेदम मारहाण करून नग्न केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर
  3. Manipur Violence : 'मिझोरम सोडा, नाहीतर...', मैतेई समुदायाच्या नागरिकांना धमकी; सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
Last Updated : Jul 24, 2023, 10:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details