महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोबाईल लुटणाऱ्या तरुणांना जमावाकडून बेदम मारहाण; दोघांचा मृत्यू, एक गंभीर - ओडिशा क्राइम न्यूज

Mob lynching : ओडिशातील बरगढ जिल्ह्यात संतप्त जमावानं तीन तरुणांना बेदम मारहाण केली. या तरुणांवर मोबाईल फोन आणि पैसे लुटल्याचा आरोप आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी...

Mob lynching
Mob lynching

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 6:31 PM IST

बरगढ (ओडिशा) Mob lynching : ओडिशातील बरगढ जिल्ह्यात मॉब लिंचिंगची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी आहे.

एकाचा जागीच मृत्यू : पोलिसांनी सांगितलं की, मंगळवारी (२१ नोव्हेंबर) बरगढ जिल्ह्यातील साहुतिक्रा गावात काही महाविद्यालयीन विद्यार्थी घरी परतत असताना वाटेत चार तरुणांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी याची माहिती त्यांच्या पालकांना दिली. तेव्हा गावकऱ्यांनी या चार तरुणांना पकडलं. यापैकी एक तरुण पळून जाण्यात यशस्वी झाला, तर उर्वरित तिघांना जमावानं बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा स्थानिक रुग्णालयात मृत्यू झाला.

एकाची प्रकृती चिंताजनक : तिसऱ्या तरुणावरही जमावानं हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची जीवन मरणाची लढाई सुरू आहे. विजय बाग असं जागीच मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून, तो पंढरीपठार गावाचा रहिवासी आहे. तर बिकू जल असं दुसऱ्या मृत तरुणाचं नाव आहे. तो संबलपूरचा राहणारा आहे.

बरगढ जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ : मिळालेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. गंभीर अवस्थेतील दरोडेखोरांना जमावाच्या तावडीतून वाचवून बरगढ रुग्णालयात नेण्यात आलं. बरगढ जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून चोरी, दरोड्यासारख्या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या आधी १८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा धांगेर येथे काही लोकांनी चोरट्याला पकडून बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

हेही वाचा :

  1. Crime News : चोरीसाठी तरुणाला 'तालिबानी शिक्षा', बेदम मारहाण, कपडे फाडून केले मुंडन
  2. Solapur Mob Lynching : गोहत्येच्या कारणावरून सोलापुरात दोघांना बेदम मारहाण, एकाची प्रकृती गंभीर
  3. Crime News : अपघातात मुलाचा मृत्यू; जमावाने केली ट्रॅक्टर चालकाची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details