चैन्नई -केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत मक्कल निधी मय्यम पक्षाचे सरचिटणीस ए अरुणाचलम भाजपमध्ये दाखल झाले आहेत. पुढील वर्षी मे महिन्यात तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांवर मतदान होणार आहे. अभिनेता-राजकारणी आणि मक्कल मक्कल निधी मय्यमचे प्रमुख कमल हासन स्वत: आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मार्गावर आहेत.
चेन्नईतील भाजपा पक्षाच्या कार्यालयात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत एमएनएमच्या कोअर टीममध्ये नियुक्त झालेल्या अरुणाचलम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अरुणाचलम हे व्यवसायाने वकील असून ते तुतीकोरिन जिल्ह्यातील रहिवासी आहेच.
भाजपने शेतकर्यांना पैसे देण्याचे दृष्टीने तीन शेतीविषयक कायदे केले आहेत. मी कृषी कुटुंबातून आलो आहे. शेतकर्यांना उपयुक्त ठरणाऱ्या कृषी कायद्यांना पाठिंबा देण्यासाठी मी कमल हासन यांना आग्रह केला. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यानंतर मी हा निर्णय घेतला, असे अरुणाचलम म्हणाले.