पणजी (गोवा) - गोवा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांनी मंगळवारी विधानसभेत शपथ ( MLAs sworn in Goa ) घेतली. हंगामी सभापती गणेश गावकर यांनी सर्व उपस्थित आमदारांना आमदारकीची शपथ दिली.
हेही वाचा -MP Arvind Sawant in Parliament : खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत या केल्या मागण्या
गोवा विधानसभेचा कार्यकाळ बुधवारी 16 मे ला संपुष्टात येत आहे. त्यामुळे, हा कार्यकाळ संपण्यागोदार सर्व आमदारांना मंगळवारी शपथ देण्यात आली आहे. त्यामुळे, गोवा विधानसभेच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री शपथ घेण्याअगोदर आमदारांनी शपथ घेतली आहे.
इतिहासात पहिल्यांदाच आमदारांना शपथ
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, मात्र विधिमंडळ नेता निवडीवरून भाजपात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. अद्याप मुख्यमंत्री कोण होणार याच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यातच गोवा विधानसभेचा कार्यकाळ बुधवारी 16 मार्च ला संपुष्टात येत आहे. त्यामुळे, हा कार्यकाळ संपण्यागोदार सर्व आमदारांना मंगळवारी शपथ देण्यात आली आहे. त्यामुळे, गोवा विधानसभेच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री शपथ घेण्याअगोदर आमदारांनी शपथ घेतली आहे.
काँग्रेसचे स्वप्न भंगले
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपणच सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला होता. मात्र, बहुमताचा आकडा प्राप्त न झाल्यामुळे काँग्रेसचे सत्ता स्थापनेचे स्वप्न अपुरे राहिल्याची खंत काँग्रेस आमदारांनी शपथ विधिवेळी व्यक्त केली.