मध्य प्रदेश (जबलपुर) - काँग्रेसचे आमदार संजय यादव यांच्या मुलाने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विभोर संजय यादव असे त्याचे नाव आहे. विभोरने (My Friend went, I am Going ) माझा मित्र गेला, मी त्याच्याकडे जात आहे असे त्याने आत्महत्येपुर्वी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये लिहले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, विभोरने आपल्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवले नाही.
MLA Son Suicide Case -माझा मित्र गेला, मी त्याच्याकडे जात आहे
काँग्रेसचे आमदार संजय यादव यांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. दरम्यान, विभोरने लिहले आहे की, माझे आई-वडिल खूप चांगले आहेत. तसेच, त्याने आपला मित्र गेला, मीही चाललो आहे असा एक एसएमएस पाच लोकांना पाठवला होता. त्यामध्ये तो म्हणतो, तुम्ही खूप चांगले आहात. पण मी आता चाललो आहे. विभोरचा एकही मित्र राहिला नाही, त्यामधून आलेल्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
MLA Son Suicide Case - कामासंबंधी बैठक सुरू होती