महाराष्ट्र

maharashtra

तामिळनाडू : एम. के. स्टॅलिन ७ मे रोजी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; दहा वर्षानंतर सत्ता

By

Published : May 5, 2021, 4:53 PM IST

एम. के. स्टॅलिन यांची डीएमके विधानसभेच्या चेअरमनपदी ४ मे रोजी निवड झाली आहे. डीएमके नेता स्टॅलिन आणि दुराईमुरुगन, टी. आर. बालू, के. एन. नेहरू, आर. एस. भारती यांनी राज्यपाल बनवरीलाल पुरोहित यांची राजभवनमध्ये भेट घेऊन सत्ता स्थापनेकरता दावा केला आहे.

सत्ता स्थापनेचा दावा
सत्ता स्थापनेचा दावा

चेन्नई - बहुमत मिळाल्याने दहा वर्षानंतर द्रमुक पक्ष तामिळनाडूमध्ये सत्तेत येणार आहे. द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे ७ मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत

तामिनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २ मे रोजी पार पडली आहे. तामिळनाडूमध्ये सत्तेत येण्यासाठी २३३ जागांपैकी ११८ जागा पक्षाला मिळवाव्या लागत होत्या. एकट्या द्रमुकने (डीएमके) १३३ जागांवर विजय मिळवून बहुमत मिळविले आहे.

हेही वाचा-भाषिक समानता, प्रांतिक अस्मिता जपणार! राज ठाकरेंच्या ट्विटला स्टॅलिन यांचे उत्तर

डीएमकेकडून सत्तास्थापनेचा राज्यपालांकडे दावा-

एम. के. स्टॅलिन यांची डीएमके विधानसभेच्या चेअरमनपदी ४ मे रोजी निवड झाली आहे. डीएमके नेता स्टॅलिन आणि दुराईमुरुगन, टी. आर. बालू, के. एन. नेहरू, आर. एस. भारती यांनी राज्यपाल बनवरीलाल पुरोहित यांची राजभवनमध्ये भेट घेऊन सत्ता स्थापनेकरता दावा केला आहे. डीएमके नेते एम. के. स्टॅलिन यांनी १३३ सदस्यांचे पाठिंबा असलेले स्वाक्षरीनिशी पत्र राज्यपालांना दिले आहे. त्यांनी राज्यात सत्तास्थापना करण्यासाठी अधिकार देण्याची मागणी केली आहे. राज्यपालाकंडून शपथविधी कार्यक्रमाची घोषणा होणार असल्याचे डीएमकेचे सचिव आर. एस. भारती यांनी माध्यमांना सांगितले.

राज्यापालांनी एम. के. स्टॅलिन यांना दुपारी दीड वाजता बोलावून घेतले. त्यावेळी राज्यपालांनी स्टॅलिन यांना ७ मे रोजी सकाळी नऊ वाजता साधेपणाने शपथ घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा-ऐतिहासिक कौल, मतदारांची नेमकी नाडी ओळखण्यात निवडणूक पंडित अपयशीच

महिला मतदारांची एकगठ्ठा मते द्रमुकच्या पाठिशी

दुसरीकडे तामिळनाडूमध्ये दहा वर्षं विरोधी पक्षात राहिलेल्या द्रमुकला यावेळी लोकांनी संधी दिली आहे. द्रमुक आघाडीला एकूण १३३ जागांवर विजय मिळाला आहे. तर अण्णाद्रमुकला केवळ ६६ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे स्टॅलिन यांच्यावरील लोकांचा विश्वास सिद्ध झाला आहे. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी चेपॉक मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला. जयललितांमुळे महिला मतदारांच्या मतांचा मोठा वाटा अण्णाद्रमुकला मिळत असे. पण आता महिला मतदारांची एकगठ्ठा मते द्रमुकच्या पाठिशी राहिलेली आहेत. अण्णाद्रमुकच्या दहा वर्षाच्या प्रस्थापित विरोधी राजवटीनंतर केवळ द्रमुक सत्तेवर आला आहे,

ABOUT THE AUTHOR

...view details