ऐझॉल : निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळून तब्बल 17 मजुरांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मिझोराममधील सायरांग परिसरात बुधवारी घडली आहे. या पुलावर 40 पेक्षा जास्त मजूर काम करत होते. मात्र पूल कोसळल्यानं अनेक मजूर या पुलाखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Railway Bridge Collapse In Mizoram : मिझोरममध्ये मृत्यूचं तांडव, रेल्वेचा निर्माणाधीन पूल कोसळून 17 मजुराचा मृत्यू - मजुरांचा मृत्यू
मिझोरममध्ये निर्माणाधीन रेल्वेचा पूल कोसळल्यानं तब्बल 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ऐझॉल शहरापासून 21 किमी अंतरावर बुधवारी घडली आहे. घटनास्थळी रेल्वे विभागाचं आपात्काली पथक दाखल झालं आहे. आपात्कालीन विभगाकडून बचावकार्य सुरू आहे.
![Railway Bridge Collapse In Mizoram : मिझोरममध्ये मृत्यूचं तांडव, रेल्वेचा निर्माणाधीन पूल कोसळून 17 मजुराचा मृत्यू Railway Bridge Collapse In Mizoram](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/23-08-2023/1200-675-19336518-thumbnail-16x9-bridge.jpg)
Published : Aug 23, 2023, 1:28 PM IST
|Updated : Aug 23, 2023, 2:21 PM IST
ढिगाऱ्याखालून काढले 17 मृतदेह :मिझोरममधील ऐझॉल शहरापासून 21 किमी अंतरावर असलेल्या निर्माणाधीन पुलावर हे मजूर काम करत होते. मात्र अचानक या पुलाचा ढिगारा कोसळला. त्यामुळे पुलावर कार्यरत मजूर ढिगाऱ्याखाली दबले. या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 17 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनेक मजूर अद्यापही बेपत्ता आहेत. या मजुरांना शोधण्याचं काम सुरू असल्याचं रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा -