नवी दिल्ली -मिझोरममध्ये राहणाऱ्या जिओना चाना यांचं 76 व्या वर्षी निधन झालं आहे. जिओना यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. ते जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख होते. चाना यांना ३८ पत्नी असून ८९ मुलं आहेत. मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख जिओना चाना यांचं 76 व्या वर्षी निधन - जिओना चाना मिझोरम
जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख जिओना चाना यांचं 76 व्या वर्षी निधन झालं आहे. चाना यांना ३८ पत्नी असून ८९ मुलं आहेत. मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

जगातील या सर्वात मोठ्या कुटुंबाला बघण्यासाठी जगभरातून लोक यायचे. जिओना चाना यांच्या कुटुंबात 38 पत्नी, 89 मुलं आणि 33 नातू-पणतू आहेत. जिओना यांचं पूर्ण कुटुंब एकत्र राहतं. सर्वजण त्यांना नेमून दिलेली कामं करतात. डॉक्टर लालरिंटलुआंगा झाउ यांनी सांगितलं की, जिओना यांना मधुमेह आणि हायपरटेंशनने ग्रासलं होतं. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
जिओना चाना यांचं भलंमोठं कुटुंब 100 खोल्यांच्या चार मजली घरात राहतं. घरातील सर्व पुरुष व्यापार करतात. मिझोरमला भेट द्यायला येणारे पर्यटक या कुटुंबाला भेट देण्यासाठी नक्की यायचे.