नवी दिल्ली :कोवॅक्सीन (Covaxin) और कोविशील्ड (Covishield) लसीचा मिश्रित डोस प्रभावी असल्याचे एका अभ्यासात पुढे आले आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) यांनी हा अभ्यास केला. आईसीएमआरच्या म्हणण्यानुसार, 18 लोकांवर दोन्ही लसींची मात्र दिली. त्याचा चांगला प्रभावी जाणवल्याचे त्यात नमूद करण्यात आले.
कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिनचा मिश्र डोस प्रभावी; ICMR च्या अभ्यासाचा निष्कर्ष
कोवॅक्सिन (Covaxin) और कोव्हिशील्ड (Covishield) लसीचा मिश्र डोस प्रभावी असल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) यांनी हा अभ्यास केला. आईसीएमआरच्या म्हणण्यानुसार, 18 लोकांवर दोन्ही लसींची मात्र दिली. त्याचा चांगला प्रभावी जाणवल्याचे त्यात नमूद करण्यात आले.
उत्तरप्रदेशमधील काही लोकांवर आयसीएमआरने याचे अध्ययन केले. त्याना कोविशील्डची पहिली मात्रा देण्यात आली. त्यानंतर सहा आठवड्याच्या फरकाने कोवॅक्सीनची मात्रा देण्यात आली. आयसीएमआरचे डॉ. समीरने पांडा यांच्या म्हणण्यानुसार, हा एक नैसर्गिक प्रयोग होता, त्यामध्ये त्यांनी अनवधानाने वेगवेगळे डोस घेण्यात आले. तसेच लोकांमधील संभ्रम दूर व्हावा यासाठी हा प्रयोग करण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं. यामध्ये एकुण 18 व्यक्ती होते. त्यामध्ये 11 पुरूष आणि सात महिलांचा समावेश होता, ज्याचं सरासरी वय 62 होते.