कौशिकी कुमारी, सुनीता देवी यांची प्रतिक्रिया बेतिया (बिहार) Missing Children Return Home : बिहारमधील बेतियाच्या नरकटियागंज प्रकाशनगरमधून 2016 मध्ये दोन अल्पवयीन मुलं घराबाहेरून बेपत्ता झाली होती. गेल्या सात वर्षांपासून संपूर्ण कुटुंब या दोन्ही मुलांचा शोध घेत होतं. मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. दोन्ही मुलं गेल्या वर्षभरापासून लखनऊ बालसुधारगृहात राहात होती. 2023 मध्ये 19 वर्षीय कौशिकी कुमारीनं इयत्ता नववीची परीक्षा दिली तेव्हा ही बाब समोर आली.
सात वर्षानंतर मुलं घरी परतली :बालसुधारगृहात अभ्यासासाठी फॉर्म भरण्यासाठी आधारकार्ड आवश्यक होतं. अशा परिस्थितीत जेव्हा दोन्ही मुलं आधार कार्ड बनवण्यासाठी गेली, तेव्हा त्यांना समजलं की त्यांचं आधार कार्ड आधीच बनलं आहे. दोन्ही मुलांची ओळख पटली असून आता दोन्ही मुलांचे पालक सापडले आहेत. सध्या शिकारपूर पोलिसांच्या मदतीनं कौशिकी कुमार (19) तिच्या आई-वडिलांकडं आली आहे. त्याचा धाकटा भाऊ राजीव (१४) अजूनही बालसुधारगृहात आहे. त्याची परीक्षा सुरू असून परीक्षा संपताच तोही आपल्या घरी परतणार आहे.
आधारकार्डमुळं मुलं सापडली : कौशिकीनं सांगितलं की, तिला तिच्या बालपणीच्या गोष्टी आठवत नाहीत. ती कशी बेपत्ता झाली, लखनऊला कशी पोहोचली? हे तिला माहीत नाही. कौशिकी म्हणाली की, मी गेल्या सात वर्षांपासून बालगृहात राहत होते. नववीच्या वर्गात नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक होतं. मी शिक्षकासोबत आधार कार्ड बनवण्यासाठी गेल्यावर मला माझ्या आई वडिलांबद्दल माहिती मिळाली.
"इयत्ता 9वी मध्ये, नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक होतं, तेव्हा आधार कार्ड बनवण्यासाठी आम्ही गेलो. तेव्हा माझं आधार कार्ड बनवल्याचा पुरावा आधीच होता. माझं कुटुंब आधीच्या आधारकार्डद्वारे मला मिळाले ." - कौशिकी कुमारी, विद्यार्थिनी
खेळत असताना झाले बेपत्ता : शिकारपूर पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मुलीच्या घराचा शोध घेतल्याचं सांगण्यात आलं. कौशिकीचा भाऊ राजीव उर्फ इंद्रसेन अजूनही लखनौच्या बालगृहात आहे. त्याची परीक्षा सुरू असल्यानं तो घरी परतू शकला नाही. प्रकाश नगर येथील रहिवासी असलेल्या मुलांची आई सुनीता देवी यांनी सांगितले की, 21 जून 2016 रोजी 12 वर्षांची मुलगी कौशिकी, राजीव शेजारी खेळत होते. त्यादरम्यान दोघेही बेपत्ता झाले. बराच शोध घेऊनही दोन्ही मुलं सापडली नाहीत. तेव्हा कुटुंबियांनी शिकारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यामध्ये सुनीतानं आपली वहिनी मुन्नी देवी हिच्यावर मुलं गायब केल्याचा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी मुन्नीदेवीला अटक झाली होती. ती जवळपास ६ महिने तुरुंगात होती. त्यानंतर ती जामिनावर तुरुंगातून बाहेर आली.
"2016 मध्ये माझी दोन्ही मुले घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाली होती. मी गुन्हाही दाखल केला होता. सात वर्षांपासून मी त्यांचा शोध घेत होते. लखनऊ बालगृहाच्या मॅडमकडून मुलांची माहिती मला मिळाली. त्यानंतर मी लखनऊला गेले. माझी मुलगी मी घेऊन आले, मुलाची परीक्षा चालू आहे त्यामुळं त्याला आणता आलं नाही. - सुनीता देवी हरवलेल्या मुलांची आई
"बेपत्ता कौशिकीला बालगृहातून आणण्यात आलं आहे. तिचा भाऊ परीक्षेमुळं येऊ शकला नाही. कौशिकीला जबाबासाठी न्यायालयात पाठवण्यात आलं आहे."- रामाश्रय यादव, शिकारपूर पोलिस स्टेशनचे प्रमुख
असा मिळाला पत्ता : बालसुधारगृहाच्या अधिकाऱ्यांनी नरकटियागंजचे सामाजिक कार्यकर्ते वर्मा प्रसाद यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी मुलांची छायाचित्रे पाठवली. वर्मा प्रसाद यांनी दोन्ही मुलांचे फोटो त्यांची आई सुनीता देवी यांना पाठवले. आईला मुलांची ओळख पटल्यानंतर ती लखनऊला गेली. दोन्ही मुलांना घरी परतण्यासाठी शिकारपूर पोलीस ठाण्यात अर्ज केला. शिकारपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी रामाश्रय यादव यांनी आयओ सुजित दास यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली. जिथून आज पोलिसांचं पथक कौशिकी कुमारी या मुलीला घेऊन शिकारपूरला आलं आहे. पोलिसांनी मुलीला तिच्या आईच्या ताब्यात दिलं आहे. मात्र, राजीव अद्याप घरी येऊ शकलेला नाही.
हेही वाचा -
- Rahul Gandhi Visited Furniture Market : फर्निचर मार्केटमध्ये राहुल गांधींनी हाती घेतली 'करवत'
- South Actor Vishal: सेंट्रल बोर्डानं लाच मागितल्याचा दक्षिण अभिनेता विशाल कृष्णा रेड्डीचा आरोप, थेट सोशल मीडियातून जाहीर केली माहिती
- Mathura Train Accident : ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढण्याआधी लोको पायलटचा सुरू होता व्हिडिओ कॉल, पाच जण निलंबित