महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजकारणातील करियरचे स्वप्न भंग; मिस इंडियातील स्पर्धक दिक्षाचा पंचायत निवडणुकीत पराभव - Femina Miss India 2015 runner up

मॉडेल दिक्षा सिंहने राजकारणात नशीब आजमाविण्यासाठी उत्तर प्रदेशमधील पंचायतच्या निवडणुकीत सहभाग घेतला. मात्र, मतदारांनी तिला लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकारलेले नाही.

Diksha Singh
दिक्षा सिंह

By

Published : May 4, 2021, 7:02 PM IST

Updated : May 4, 2021, 7:30 PM IST

लखनौ- मिस इंडिया स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेली दिक्षा सिंह पुन्हा चर्चेत आली आहे. तिला जानपूर जिल्ह्यातील बक्षा येथील पंचायत निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिक्षा सिंह ही मिस इंडिया 2015 मध्ये रनर अप होती.

मॉडेल दिक्षा सिंहने राजकारणात नशीब आजमाविण्यासाठी उत्तर प्रदेशमधील पंचायतच्या निवडणुकीत सहभाग घेतला. महिलांसाठी राखीव असलेल्या बक्षा या जागेवरून दिक्षाने निवडणूक लढविली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरल्याने तिने सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, राजकारणात चांगल्या करियरची सुरुवात करण्यापूर्वी दिक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा-कोरोना काळात ८५ टक्के फी वसूली करण्यास खासगी शाळांना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

केवळ 2 हजार मते-

दिक्षा सिंहला भाजपच्या उमेदवार नगिना सिंह यांनी 5 हजार मतांनी पराभूत केले. दिक्षाला पंचायतच्या निवडणुकीत विकासासाठी मते मागताना केवळ 2 हजार मते मिळाली आहेत. तर ती मतांमध्ये पाचव्या क्रमांकावर राहिली आहे. मुंबईमध्ये राहणारी दिक्षा निवडणुकीसाठी जौनपूरला परतली आहे. स्थानिक भागात मुलभूत समस्या नसल्याचे सांगत तिने निवडणुकीत प्रचार केला होता. ग्रामीण भागात महिलांची स्थिती सुधारण्याचे दिक्षा सिंहने मतदारांना आश्वासन दिले होते. मात्र, मतदारांनी तिला लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकारलेले नाही.

हेही वाचा-पोलिसाने घेतली दारूची बाटली, अवैध दारुविक्री करतानाची घटना कॅमेऱ्यात कैद

सिनेमांबरोबर जाहिरातींमध्ये झळकली आहे दिक्षा सिंह-

दिक्षा ही मूळची जौनरपूर जिल्ह्यातील चित्तोरी गावामधील रहिवाशी आहे. नऊ वर्षाची असताना ती वडिलांबरोबर मुंबईला गेली होती. तिने काही सिनेमांमध्येही काम केले आहे. तसेच काही सिनेमांसाठी पटकथा लेखनही केले आहे. तसेच काही प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातीमध्येही दिक्षा झळकली होती.

Last Updated : May 4, 2021, 7:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details