नवी दिल्ली -संसदेत 11 ऑगस्ट रोजी झालेल्या गोंधळाचे माध्यमांसमोर वर्णन करताना काँग्रेसचे राज्यसभा खासदार छाया वर्मा आणि फुलो देवी नेतम यांना रडू कोसळले. पुरुष मार्शलनी महिला खासदारांना धक्काबुक्की केली. हा महिलांचा अपमान आहे, असे त्या म्हणाल्या. काँग्रेस प्रदेश कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
मला पुरुष मार्शलनी मला ढकलले आणि त्यानंतर मी खाली पडले. मी मध्यस्ती करण्यास गेले असताना माझ्याबाबत हा प्रकार घडला आहे. मध्यस्तीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना सभागृहात जमिनीवर पडले, असे काँग्रेस खासदार छाया वर्मा म्हणाल्या. या दोन्ही खासदारांनी सरकारकडे त्या दिवसाच्या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने या विषयावर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.
नेमकं काय झालं होतं?