महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Misbehave With Woman : लज्जास्पद : जमीनीच्या वादातून महिलेला मारहाण करुन केले मुंडन, 5 दिवसांनी पोलिसांनी केला गुन्हा दाखल - महिलेचा विनयभंग

सुलतानपुर जिल्ह्यातील कोतवाली देहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. गावातीलच एका महिलेचा गावातीलच रामप्रसाद याच्यासोबत जमिनीचा वाद सुरू होता. असे सांगितले जात आहे की, 21 जून रोजी राम प्रसादसह इतर अनेक लोकांनी महिलेला त्यांच्या घरी बोलावले आणि तिला ओलीस ठेवले. त्यानंतर या लोकांनी जे केले ते मानवतेला लाजवेल असे कृत्य होते. ( misbehave with woman in sultanpur )

Misbehave With Woman
जमीनीच्या वादातून महिलेला मारहाण करुन केले मुंडन

By

Published : Jul 9, 2022, 8:09 PM IST

सुलतानपूर (उत्तर प्रदेश) : माणुसकीला काळीमा फासणारी घटना सुलतानपूर जिल्ह्यात समोर आली आहे. जमिनीच्या वादातून दबंगने एका महिलेला बंधक बनवून तिचा विनयभंग करुन तिचे मुंडन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ( misbehave with woman in sultanpur ) आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचवेळी या प्रकरणी किरकोळ कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी आपली सुटका करून घेतली.

जमीनीच्या वादातून महिलेला मारहाण करुन केले मुंडन

महिलेला ठेवले होते ओलीस - ही घटना जिल्ह्यातील कोतवाली देहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. गावातीलच एका महिलेचा गावातीलच रामप्रसाद याच्यासोबत जमिनीचा वाद सुरू होता. असे सांगितले जात आहे की, 21 जून रोजी राम प्रसादसह इतर अनेक लोकांनी महिलेला त्यांच्या घरी बोलावले आणि तिला ओलीस ठेवले. त्यानंतर या लोकांनी जे केले ते मानवतेला लाजवेल असे कृत्य होते.

महिलेचे केले मुंडन - लोकांनी तिचे महिलेचे कपडे काढले आणि नंतर तिला बेदम मारहाण केली. गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे समाधान न झाल्याने त्यांनी महिलेचे मुंडन केले. घटनेच्या 5 दिवसांनंतर 26 जून रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे संपूर्ण वास्तव समोर आले आहे. महिला आणि शेजारी यांच्यात कौटुंबिक भांडण झाले होते.

आरोपींना न्यायालयीन कोठडी - पोलीस अधिकारी सतीश चंद्र शुक्ला यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

हेही वाचा -Sri Lankan Prime Minister Resigns : रनिल विक्रमसिंघे यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा

ABOUT THE AUTHOR

...view details