मिर्झापूर (उत्तर प्रदेश) : मिर्झापूर जिल्ह्यातील संत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रेमप्रकरण समोर आले आहे. येथे एक पत्नी शेजारच्या तरुणाशी बोलत असल्याचे पाहून पतीने तिचे लग्न लावून दिल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा विषय परिसरात चर्चेचा ठरला आहे. मात्र संतनगर पोलिस ठाण्याचे प्रमुख अरविंदकुमार सरोज यांनी असे काही झाले नसल्याचे म्हटले आहे. असे काही निदर्शनास आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
तरुणीचे दुसऱ्यासोबत होते प्रेमप्रकरण : मिळालेल्या माहितीनुसार, मिर्झापूर जिल्ह्यातील एका तरुणाचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. मात्र आता त्याच तरुणाने आपल्या वधूचे दुसऱ्यासोबत लग्न लावून दिले. वास्तविक नववधूला तिच्या प्रियकरासोबत राहायचे होते. नवऱ्याने तिला मोबाईलवर बोलताना पाहिले होते. यानंतर प्रकरण वाढल्याने पतीने पत्नीचा तिच्या प्रियकरासोबत लग्न लावण्याचा निर्णय घेतला. तरुणाने वधूच्या नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना बोलावून गावात पंचायत बोलावली. गावातील जेष्ठ लोकांनी समजूत घालूनही तरुण त्याच्या पत्नीसोबत राहण्यास तयार झाला नाही. त्यानंतर ग्रामस्थ व कुटुंबीयांच्या उपस्थितीत वधूचे तिच्या प्रियकराशी गावातील मंदिरात लग्न लावून निरोप देण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.