मोरेना (मध्यप्रदेश): जिल्ह्यातील पहाडगडच्या जंगलात मिराज लढाऊ विमान पडल्याने आग लागली. माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा पहाडगडच्या जंगलात रवाना करण्यात आला. ही घटना पहाडगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानपूर ईश्वरा महादेव जंगलातील आहे. हवेमध्ये या दोन विमानांची टक्कर झाली की नाही याची खात्री करण्यासाठी भारतीय वायुसेनेने न्यायालयीन चौकशी सुरू केली असल्याचे समजते. मात्र प्राथमिक माहितीनुसार टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सुखोई-३० आणि मिराज २०० विमानांचा सुरु होता सराव: मध्य प्रदेशातील मुरैनाजवळ सुखोई-३० आणि मिराज २००० विमाने कोसळली. शोध आणि बचाव कार्य सुरू केले. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते जेथे सराव सुरू होता. सुखोई-३० मध्ये दोन वैमानिक आणि मिराज २००० विमानात एक पायलट होता. प्राथमिक वृत्तानुसार, दोन पायलट सुरक्षित आहेत, तर तिसऱ्या पायलटला वाचवण्यासाठी एक हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे.
ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण भरले होते: दोन्ही लढाऊ विमानांनी आज सकाळी ग्वाल्हेरच्या आयएएफ एअरबेसवरून उड्डाण केले. यानंतर सुखोई-३० आणि मिराज २००० ही दोन्ही लढाऊ विमाने मुरैनाजवळ कोसळली. या मोठ्या हवाई अपघातानंतर माहिती मिळताच मदत पथक घटनास्थळी पोहोचले. हवाई दलाच्या सूत्रांच्या हवाल्याने असे समजले आहे की, दोन्ही विमाने ग्वाल्हेरहून नियमित उड्डाणाने निघाली होती. हे देशातील सर्वात मोठ्या एअरबेसपैकी एक आहे जेथे फ्रेंच बनावटीच्या मिराज आणि सुखोई विमानांचे ग्राउंड आहेत. येथे जवळपास दररोज सराव सुरू असतो आणि लढाऊ विमाने उडतात.