आगरतळा (आसाम) :Tripura Killing: राज्यातील आगरतळामध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने कथितरित्या त्याची आई, बहीण आणि आजोबा यांच्यासह चार जणांची हत्या करून त्यांना खड्ड्यात पुरले. शनिवारी रात्री उशिरा धलाई जिल्ह्यातील कमालपूर येथे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पत्रकार परिषदेदरम्यान, धलाई जिल्हा पोलिस अधीक्षक रमेश यादव यांनी सांगितले की, घटनेनंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि तीन महिला आणि एका पुरुषाच्या मृतदेहांसह चार मृतदेह बाहेर काढले आणि आरोपी अल्पवयीन आहे. MINOR HELD FOR KILLING FOUR
पोलिसांनी सांगितले की, 'अल्पवयीन मुलाने त्यांची हत्या केली असून आम्ही अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. स्थानिक सूत्रांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी उशिरा एका 13 वर्षांच्या मुलाने त्याची आई, बहीण, आजोबा आणि त्याच्या शेजारच्या एका महिलेची हत्या केली. स्थानिक लोकांनी सांगितले की, त्यांची हत्या केल्यानंतर त्याने त्यांना एका खड्ड्यात एकत्र पुरले, मात्र हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.