पाटणा ( बिहार ) :बिहारच्या गयामध्ये होळीच्या सणाला गालबोट लागले. एका व्यक्तीने होळी खेळण्यास नकार दिल्याने त्यांच्या मुलीवर गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. रंग लावण्याचा कारणावरून आधी तिथे भांडण झाले, मग शिवीगाळ करण्यात आला होता. गया जिल्ह्यातील पंचनपूर ओपी भागात ही मोठी घटना घडली. याठिकाणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी 9 आरोपींपैकी एकाला अटक केली आहे.
हत्या करून आरोपी फरार :पंचनपूर ओपीच्या टेपा गावात मिथिलेश प्रसाद यांच्या घरी काही लोक होळी खेळण्यासाठी आले होते. मिथिलेश प्रसाद यांनी होळी खेळण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. सध्या सर्वजण फरार झाले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. गावात मात्र शोकळा पसरली आहे. गावातील सर्व ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पंचनपूर ओपीमध्ये एफआयआर दाखल :हत्ये प्रकरणी मिथिलेश प्रसाद यांनी पंचनपूर ओपीमध्ये एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये सहा जणांची नावे दिली आहेत. तीन अज्ञातांना आरोपी म्हणून सांगण्यात आले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पंचनपूर ओ.पी.चे पोलीस कारवाई करत आहेत. दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गयाचे एसएसपी आशिष भारती यांनी धटनेचे गांभीर्य घेऊन पंचनपूर ओपी, टिकरी पोलिस स्टेशनच्या पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तात्काळ घटनेचा छडा लावण्याचे आदेश दिले आहेत.