प्रतापगड : Minor Girl Gangraped: उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातून एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी रात्री घराबाहेर शौचास आलेल्या मुलीला नराधमांनी त्यांच्या वासनेची शिकार बनवले. हे प्रकरण देहूपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. जिथे शेतात शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीला गावातील दोन नराधमांनी पकडून मारहाण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी तरुणीला धमकावत घटनास्थळावरून पळून गेले. minor girl gang raped in pratapgarh of UP
Minor Girl Gangraped: घराबाहेर पडलेली मुलगी बनली वासनेची शिकार, प्रतापगडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - 2 arrested for gang rape pratapgarh
Minor Girl Gangraped: प्रतापगडमधून सामूहिक बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे शेतात शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून घटनास्थळावरून पळ काढला. minor girl gang raped in pratapgarh of UP
बलात्कारांच्या तावडीतून सुटलेल्या मुलीने घरी धाव घेतली आणि घरच्यांना झालेली घटना सांगितली. कुटुंबीयांनी तातडीने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विद्या सागर मिश्रा Additional Superintendent Vidya Sagar यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा पीडितेच्या गावात पोहोचला आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सामूहिक बलात्काराच्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर सामूहिक बलात्कार, धमकावणे, पॉस्को यासह अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कारागृहात पाठवण्याची तयारी केली आहे.
पूर्वेचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विद्या सागर मिश्रा यांनी सांगितले की, सामूहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आले आहे. पीडितेने दोघांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रतापगडच्या देल्हापूर पोलीस ठाण्यात १५ दिवसांत सामूहिक बलात्काराची ही दुसरी घटना आहे. देहूपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.