श्रीनगर :अंकिता भंडारी हत्या प्रकरणानंतर लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अंकिताचा मृतदेह श्रीनगर मेडिकल कॉलेजच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. संतप्त लोकांनी शवागाराचा घेराव केला आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संतप्त लोकांनी बद्रीनाथ महामार्ग रोखून ( people jam badrinath highway ) धरला. त्याचवेळी पौडी जिल्ह्यातील 6 आमदार अद्याप नातेवाईकांना भेटण्यासाठी पोहोचलेही नाहीत. गढवालचे खासदार तीरथ रावत आणि बद्रीनाथचे काँग्रेस आमदार राजेंद्र भंडारी हे दोघेच भेटायला येऊन गेले आहेत.
उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्याप्रकरणानंतर लोकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.अंकिता भंडारीच्या कुटुंबीयांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अंतिम पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच अंकितावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अंकिता ही पौडी जिल्ह्यातील रहिवासी होती, मात्र, पौडी जिल्ह्यातील मंत्री आणि आमदार अद्याप कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचलेले नाहीत.
तीरथसिंग रावत यांनी घेतली कुटुंबीयांची भेट: त्याचवेळी पौडी गढवालचे खासदार तीरथसिंग रावच यांनी अंकिता भंडारी यांच्या वडिलांची आणि कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, या दुःखाच्या काळात आम्ही सर्व कुटुंबासोबत उभे आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. कुटुंबाला पूर्ण न्याय मिळेल, दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल आणि कुटुंबाला सरकारकडून सर्वतोपरी मदत मिळेल.