महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एमईएस ही महाराष्ट्र एकीकरण समिती नसून ती महाराष्ट्र भित्रट समिती, कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा यांची टीका - महाराष्ट्र भित्रट समिती टीका ईश्वरप्पा

सांगोली रायण्णाच्या पुतळाच्यी विटंबणा करणारे समाजकंटक आणि ज्या लोकांनी कन्नड झंड्याला जाळले त्यांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे, असा संताप कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के.एस ईश्वरप्पा यांनी व्यक्त केला आहे.

Karnataka minister Ishwarappa
कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा

By

Published : Dec 20, 2021, 9:42 PM IST

बेळगाव (बंगळुरू) - सांगोली रायण्णाच्या पुतळाच्यी विटंबणा करणारे समाजकंटक आणि ज्या लोकांनी कन्नड झंड्याला जाळले त्यांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे, असा संताप कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के.एस ईश्वरप्पा यांनी व्यक्त केला आहे.

अधिवेशनात बोलताना मंत्री के.एस ईश्वरप्पा

हेही वाचा -Wild Elephant In Assam : 'गजराज' पिसाळला! एका गावकऱ्याला संतप्त हत्तीने चिरडलं, पाहा VIDEO

बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात ईश्वरप्पा यांनी सदर टीका केली. यावेळी त्यांनी एमईएस ( महाराष्ट्र एकीकरण समिती ) संघटनेवर हल्ला चढवला. जिल्ह्यात एमईएसची घृणास्पद कृत्ये वाढत चालली आहे. एमईएस ही महाराष्ट्र एकीकरण समिती नसून ती महाराष्ट्र भित्रट समिती आहे. सांगोली रायण्णाच्या पुतळाच्यी विटंबणा आणि कन्नड झंड्याची जाळपोळ या दोन्ही घटनांचा मी विरोध करतो. हे निंदनीय कृत्य आहे. जे कोणी या कृत्यात सहभागी होते त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे, असे मंत्री ईश्वरप्पा म्हणाले.

काय झाले होते?

शुक्रवारी बेळगाव येथील धर्मवीर संभाजी महाराज सर्कल येथील सांगोली रायण्णाच्या पुतळ्याची विटंबणा करण्यात आली होती. त्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हलसी गावात काही समाजकंटकांनी कन्नड झेंडा पेटवला होता. त्यांनी बसवण्णा (१२ व्या शतकातील तत्त्वज्ञ, कवी, समाजसुधारक) यांच्या चित्रालाही विद्रुप केले होते.

हेही वाचा -Desecrate Golden Temple: कायदा-सुव्यवस्थेचा भंग केल्यास कठोर कारवाई होणार - पोलीस महासंचालकांचा इशारा

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details