नवी दिल्ली :मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले मंत्री सत्येंद्र जैन ( Minister Satyendra Jain in the Delhi Government ) यांना 13 जूनपर्यंत राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. ( Satyendra Jain Money Laundering case ) त्यांना 30 मे रोजी ईडीने ( Enforcement Directorate ) अटक केली होती.
13 जूनपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी -आज त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची 13 जूनपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली. सुनावणीदरम्यान ईडीने सत्येंद्र जैन यांना पाच दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयाला केली. जैन चौकशीत सहकार्य करत नाहीत. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेणे बाकी असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले.