मुंबई : एनएमआयसी अर्थात भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालय हा आपल्या देशाचा समृद्ध वारसा आहे असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर ( Anurag Thakur visited National Museum of Indian Cinema ) यांनी व्यक्त केले. ठाकूर यांनी आज मुंबईतील एनएमआयसी अर्थात भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाला त्यांनी भेट दिली, तेव्हा ते बोलत होते.
सिनेमा ही भारताची शक्ती आहे. ही जगभरातील लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य करते, असेही ते म्हणाले. मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्या चित्रपटांनी भारताची ओळख निर्माण केली आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
ठाकूर यांनी केले आवाहन
भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयातील विविध विभागांना भेट दिली. तर गेल्या शंभर वर्षातील चित्रपटसृष्टीचा इतिहास आणि तंत्रज्ञानात झालेले बदल पाहायला मिळतील असे सांगितले. त्यांनी प्रत्येक व्यक्तीने या संग्रहालयाला भेट द्यावी असेही आवाहन यावेळी केले. मुंबईत असताना एनएमआयसीला भेट दिली नाही तर मुंबईची भेट अपूर्ण राहील, असे त्यांनी यावेळी नमूद केले.