महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mimicry Artist Shyam Rangeela : नक्कलकार शाम रंगीलाचा 'आप'मध्ये प्रवेश - कॉमेडीयन शाम रंगीला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल यांची नक्कल करणारे राजस्थानमधील रहिवासी कलाकार श्याम रंगीला यांनी गुरुवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. आम आदमी पार्टीचे राजस्थान निवडणूक प्रभारी विनय मिश्रा यांनी श्याम रंगीला यांचा जयपूरमध्ये आम आदमी पक्षात समावेश करून घेतला.

नक्कलकार शाम रंगीलाचा 'आप'मध्ये प्रवेश
नक्कलकार शाम रंगीलाचा 'आप'मध्ये प्रवेश

By

Published : May 6, 2022, 10:52 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल यांची नक्कल करणारे राजस्थानचे रहिवासी श्याम रंगीला यानी काल गुरूवारी (दि. 5 मे )रोजी राजस्थानमध्ये आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. ( Mimicry artist Shyam Rangeela ) निवडणूक प्रभारी विनय मिश्रा यांनी त्यांचे पार्टीत स्वागत केले. रंगीला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतात. तसेच, त्यांच्या मिमिक्रिला मोठी पसंतीही लोकांची आहे.

दोन दिवसांपूर्वी दिल्लीतश्याम रंगीला यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यावेळी श्याम रंगीला यांनी दिल्ली सरकारी शाळा आणि मोहल्ला क्लिनिकलाही भेट दिली होती. ( Mimicry Artist Shyam Rangeela Joined AAP ) त्यावेळी तेथील व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले होते. आम आदमी पक्षात सामील झाल्यानंतर रंगीला यांनी ट्विट केले की, राजस्थानलाही 'विकासाचे राजकारण' हवे आहे. आता आम्ही विकासासह आप सोबत आहोत अस ते म्हणाले आहेत.

राजस्थान आपच्यावतीने ट्विट करण्यात आले की, राजस्थानचे प्रसिद्ध विनोदी अभिनेता श्याम रंगीला यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे. श्याम रंगीला जी आपल्या व्यंगचित्राने लोकांच्या दु:खी चेहऱ्यावर हसू आणत आहेत, आता ते कलेसोबतच देशात ‘विकासाचे राजकारण’ करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या साथीने शिक्षण आणि आरोग्य क्रांतीचा जागर करणार आहेत, अस यामध्ये म्हटले आहे.

श्याम रंगीला यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी निवडणूक लढवण्याच्या किंवा तिकीट मिळवण्याच्या उद्देशाने आम आदमी पक्षात प्रवेश केलेला नाही. पण समाजसेवा आणि विकास हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे ते परिवर्तनासाठी पक्षाशी जोडले गेले आहेत. मात्र, पक्षाने याबाबत काही आदेश दिल्यास ते पाहून निवडणूक लढवू, असेही श्याम रंगीला यांचे म्हणाले आहे.


हेही वाचा -Corona Crisis : कोरोना संकट! गेल्या दोन वर्षांत दीड कोटी लोकांनी जीव गमवला -WHO

ABOUT THE AUTHOR

...view details