श्रीनगर : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धविरामदरम्यान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यावर पाणी फेकत जम्मू-काश्मीर पोलिसांनी नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला Militants Killed Near LoC आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली. Militants Killed in Kupwara At LoC In Jammu Kashmir
Militants Killed Near LoC: भारतात आले अन् जागेवरच मेले.. सीमेवर दोन दहशतवाद्यांचा सैन्याने केला खात्मा - कुपवारामध्ये दहशतवाद्यांना मारले
पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यावर पाणी फेकत जम्मू-काश्मीर पोलिसांनी नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला Militants Killed Near LoC आहे. Militants Killed in Kupwara At LoC In Jammu Kashmir
सीमेवर दोन दहशतवाद्यांचा सैन्याने केला खात्मा
मिळालेल्या माहितीनुसार, माछिल कुपवाडा जिल्ह्यातील टेकरी नार येथे नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृतांकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून दोन एके ४७ रायफल, दोन पिस्तूल आणि चार ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.