श्रीनगर - जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चारसू भागात सुरू असलेल्या गोळीबारात एका अज्ञात दहशतवाद्याला ठार मारल्याचा दावा केला आहे. (Militant killed in ongoing Pulwama encounter) एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एक अज्ञात अतिरेकी मारला गेला असून त्याची ओळख पटवली जात आहे. परिसरात अजूनही कारवाई सुरू आहे.
ही चकमक अवंतीपोराच्या चारसू या भागात झाली
पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल विशिष्ट माहितीवर एक घेराबंदी आणि शोध ऑपरेशन (CASO) सुरू केले. यामध्ये सैन्याची संयुक्त टीम संशयित जागेच्या दिशेने येताच लपलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर देण्यात आले आणि चकमक सुरू झाली. ही चकमक अवंतीपोराच्या चारसू या भागात झाली. सध्या पोलीस आणि सुरक्षा दल आपल्या कर्तव्यावर आहेत. याबाबत माहिती आणखी पुढे येण्याची शक्यता आहे, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
गोळीबार सुरू झाला