डोडा - जम्मू काश्मीरच्या सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत एका दहशतवाद्याला अटक केली आहे. या दहशतवाद्याकडून तीन चीनी पिस्तूल, 2 मॅग्झीन आणि 15 जिवंत काडतूसे आणि एक सायलेन्सर जप्त केले आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे कॉर्डन आणि शोधमोहीम राबवण्यात आली होती. यादरम्यान दहशतवाद्याला डोडातील बखेरियन गावातून ताब्यात घेतले आहे.
गुलाम अहमद नामक व्यक्तीच्या घरातून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तर दहशताद्याची ओळख फिरदौस अहमद नावाने झाली आहे. जम्मू काश्मीर पोलीस दहशतवाद्याची चौकशी करत आहे.