मुंबई - भारतीय नौदलाचे मिग-29 के हे विमान अरबी समुद्रात अपघातग्रस्त झाले आहे. एका वैमानिकाला वाचविण्यात यश आले आहे. तर दुसरा पायलट बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा अपघात झाला. नौदलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी फेब्रुवारीमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग 29- के विमान गोव्यात समुद्र किनाऱ्याजवळ कोसळले होते. विमानात तांत्रिक बिघाड घडल्यामुळे ही दुर्घटना घडली होती. तसेच मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे हवाई दलाचे लढाऊ विमान मिग- 21 कोसळले होते. या अपघातातून दोघेही वैमानिक बचावले होते.