महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

MIG 21 Accident in Jaisalmer : मिग-२१ जैसलमेरमध्ये कोसळले; वैमानिकाचा मृत्यू

विमान दुर्घटनेची माहिती ( Indian Air Forces MiG 21 accident ) देणारे ट्विटर हवाईदलाने केले ( Indian Air force tweet on MIG 21 accident ) आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आणि अग्नीशमन दलाचे पथक हे घटनास्थळी पोहोचले आहेत.

मिग-२१ जैसलमेरमध्ये कोसळले
MiG 21 Accindent

By

Published : Dec 25, 2021, 12:06 AM IST

Updated : Dec 25, 2021, 7:01 AM IST

जयपूर -सीडीएस बिपीन रावत यांच्या विमानाच्या अपघातानंतर पुन्हा एकदा हवाईदलाच्या विमानाचा अपघात झाला आहे. मिग-२१ हे भारतीय हवाईदलाचे लढाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना ( MiG 21 Accident in Jaisalmer ) घडली आहे. विमान शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता राजस्थानमधील जैसलमेरजवळ नॅशनल पार्कजवळ कोसळले. या दुर्घटनेत वैमानिक विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा ( Wing Commander Harshit Sinha death ) मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आणि अग्नीशमन दलाचे पथक हे घटनास्थळी पोहोचले आहेत. या दुर्घटनेची माहिती ( Indian Air Forces MiG 21 accident ) देणारे ट्विटर हवाईदलाने केले ( Indian Air force tweet on MIG 21 accident ) आहे.

मिग-२१ यांना उडत्या शवपेट्या ( flying coffin ) म्हणून अनेकांनी टीका केली होती. कारण, या लढाऊ विमानांचे सातत्याने अपघात झाले आहेत.

हेही वाचा-Sweet Basil : गोड तुळशीची पाने साखरेपेक्षा 30 पट जास्त गोड; तरीही मधूमेह रुग्णांना धोका नाही

विमान अपघातात सीडीएस रावत यांनीही गमाविले प्राण

हवाई दलाच्याहेलिकॉप्टरचा बुधवारी (८ डिसेंबर ) तामिळनाडूत अपघात ( CDS General Bipin Rawat helicopter crash ) झाला. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर 12 लष्कर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक होते. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम बिपीन रावत यांच्याकडे होते. या अपघाताविषयी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत ( Defence Minister on CDS Helicopter Crash in Lok Sabha ) निवेदन दिले. यावेळी राजनाथ सिंह यांनी नेमके अपघातावेळी काय घडले, याविषयी देखील लोकसभेत सविस्तर माहिती दिली.

हेही वाचा-VIDEO : CDS बिपिन रावत यांचा जवानांना अखेरचा व्हिडिओ संदेश.. मृत्यूच्या एक दिवस आधी केला होता रेकॉर्ड

Last Updated : Dec 25, 2021, 7:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details