नवी दिल्ली -भारतीय हवाई दलाचे मिग-21 बायसन या विमानाचा अपघात झाला आहे. या घटनेत वैमानिक ए गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे. ए गुप्ता यांच्या कुटुंबाप्रती भारतीय हवाई दलाने संवेदना व्यक्त केल्या. यासंदर्भात भारतीय हवाई दलाने टि्वट करून माहिती दिली.
भारतीय हवाई दलाच्या मिग -21 विमानाचा अपघात; वैमानिकाचा मृत्यू - MiG-21 Bison aircraft of IAF Crashed
भारतीय हवाई दलाचे मिग-21 बायसन या विमानाचा अपघात झाला आहे. या घटनेत वैमानिक ए गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे.
![भारतीय हवाई दलाच्या मिग -21 विमानाचा अपघात; वैमानिकाचा मृत्यू हवाई दल न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11043113-1104-11043113-1615967962377.jpg)
हवाई दल न्यूज
मध्य भारतातील एअरबेसवर लढाऊ प्रशिक्षण मोहिमेसाठी जाताना हा अपघात झाला. तळावरून नेहमीच्या सरावासाठी लढाऊ विमानांचे उड्डाण होते. अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Last Updated : Mar 17, 2021, 1:53 PM IST