पणजी:बारदेश तालुक्यातील आमदार आणि मंत्री मायकल लोबो यांनी आज (MLA Michael Lobo Resign ) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. राजीनामा दिल्यानंतर ते नेमकं कोण्यत्या पक्षात जाणार याचा खुलासा त्यांनी अद्याप केला नसला तरी ते कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
...म्हणून दिला राजीनामा -
शिवोलीम मतदारसंघातून मायकल लोबो यांच्या पत्नी डिलियाना लोबो निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपाने तिकीट देण्यास नकार दिल्याने मंत्री मायकल लोबो यांनी मागच्या काही महिन्यांपासून शिवोली मतदारसंघात आपले काम वाढविले आहे. डिलियाना लोबो या स्वतः आपला जनसंपर्क वाढवीत आहेत. मात्र, यामुळे येथील स्थानिक भाजपा उमेदवार आणि माजी मंत्री दयानंद मांडरेकर आणि लोबो यांच्यात अनेक वेळा वाद झाले आहेत. भाजपाने तिकीट देण्यास मनाई केल्यामुळे नाराज लोबो यांनी काँग्रेसमध्ये सपत्नीक प्रवेश करून येथून स्वतः कळणगुट आणि पत्नी डिलियाना यांना शिवोलीम मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीत उतरवायचे ठरविले आहे.