नवी दिल्ली - येथील लोकसभा अधिवेशनात रावेरचे खासदार रक्षा खडसे यांनी सिकल सेल आजाराबाबत प्रश्न उपस्थित करत येणाऱ्या समस्या निदर्शनास आणून दे रोगाच्या उच्चाटनासाठी उपाययोजना राबविण्यात यावे. तसेच या रोगाच्या रुग्णांना कायमस्वरुपी अपंगत्वाचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली.
संसदेत बोलताना रक्षा खडसे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी जिल्ह्यात सैन्यात व केंद्रीय प्रशासनात आपले कर्तव्य बजावणाऱ्यांची संख्या जास्त असून त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, सातारा जिल्ह्यातील बहुतांश जण हे सैन्यात व केंद्रीय प्रशासनात आपली सेवा देत आहेत. मात्र, त्यांच्या होणाऱ्या बदल्यांमुळे त्यांच्या पाल्यांना उत्तम शिक्षण मिळत नाही. तसेच कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यातही केंद्रीय विद्यालय नाही. केंद्रात व सैन्यात सेवा देणाऱ्यांच्या पाल्यांसाठी सातारा जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय सुरू करावे, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली.
संसदेत बोलताना श्रीनिवास पाटील वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी राज्य महामार्ग क्र. 14ला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे. मध्य प्रदेशच्या सीमेपासून म्हणजेच अमरावती जिल्ह्यापासून यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटपर्यंत राज्य महामार्ग क्र. 14 हा सुमारे 303 किलोमीटरचा महामार्ग आहे. या महामार्गावरुन मध्य प्रदेशातून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या जास्त असते तसेच जड वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. या महामार्गाची दुरवस्था झाली असून राज्य सरकार दुरुस्तीसाठी पावले उचलत नाही, असे म्हणाले. या महामार्गावर चिखदरा, हे पर्यटन क्षेत्रही आहे, यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही हा मार्ग महत्वाचा असून या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा व या मार्गाचा विकास करावा, अशी मागणी खासदार तडस यांनी केली आहे.
संसदेत बोलताना रामदास तडस हेही वाचा - MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?