मुंबई : स्वयंपाकासाठी वापरले जाणारे तेल भेसळयुक्त असेल तर ते आपल्या आरोग्याला मोठे नुकसान ठरू शकते. त्याचे नियमित सेवन एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कमी करू शकते. तेलातून नफा घेण्यासाठी त्यात भेसळ केली जाते. मात्र यामुळे तेलाची गुणवत्ता खराब होते, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. भेसळ करणारे तेलात पिवळ्या रंगाचे मेटिनलसारखा रंग किंवा त्यात ट्राय-ऑर्थो-क्रेसिल-फॉस्फेट (टीओसीपी) सारखे रासायनिक संयुग वापरतात.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) अलीकडेच आपल्या ट्विटरवर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये तेलाची गुणवत्ता, तेलातील भेसळ तपासण्याची युक्ती सांगितली आहे.
अशी ओळखा तेलातील भेसळ
जर स्वयंपाकाच्या तेलात मेटनिलसारखा पिवळा रंग वापरला असेल तर तुम्ही ते सहज शोधू शकता. FSSAI नुसार, टेस्ट ट्यूबमध्ये सुमारे 1 मिली तेल घाला आणि सुमारे 4 मिली पाणी घाला. ते चांगले मिसळा. आता 2 मिली मिश्रण दुसऱ्या नळीत घाला आणि नंतर 2 मिली सांद्रित हायड्रोक्लोरिक अॅसिड घाला.