मुंबई -महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत तसेच पश्चिम बंगालपासून राजस्थानपर्यंत पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान खात्याने (IMD)ने दिला आहे. ( Today Weather In Maharashtra ) महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात दोन ते चार अंशांची वाढ होईल असाही अंदाज व्यक्त केला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 28 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
शुक्रवारपर्यंत उष्णतेची लाट धडकेल - आयएमडीने मंगळवारी जाहीर केलेल्या बुलेटीननुसार, पुढील तीन ते चार दिवसांत कमाल तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ होणार आहे. वायव्य हिंदुस्थानात 2 ते 3 अंश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात 2 ते 4 अंशांची वाढ होऊ शकते. तसेच, राजस्थानच्या पूर्व आणि पश्चिम भागांत शुक्रवारपर्यंत उष्णतेची लाट धडकेल, असा इशारा आयएमडीने दिला आहे.