महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

MES Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 निकालात सीमावर्ती भागात एमईएस उधळणार गुलाल - सीमावर्ती भागातील मराठी बांधवांची भूमीका

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत सीमावर्ती भागातील मराठी बांधवांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

MES Karnataka Election Result 2023
संपादित छायाचित्र

By

Published : May 13, 2023, 9:14 AM IST

Updated : May 13, 2023, 2:19 PM IST

बंगळुरू :कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत आतापर्यंत काँग्रेसने आघाडी घेतल्याने काँग्रेस नेत्यांनी जल्लोष सुरू केला आहे. मात्र अद्याप कोणतेच चित्र स्पष्ट झाले नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप काँग्रेसला महाराष्ट्र एकीकरण समितीने तगडे आव्हान दिले आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रा एकीकरण समिती तीन जागांवर गुलाल उधळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

सीमावर्ती भागातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला :कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने सर्वस्व पणाला लाऊन प्रचार केला आहे. सीमावर्ती भागातील मराठी बांधवांच्या हक्कासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने या निवडणुकीत रान उठवले आहे. त्याचा फटका महाराष्ट्रातील कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला गेलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांनाही बसला आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील नेत्यांची प्रतिष्ठाही या निवडणुकीत पणाला लागली आहे. सीमावर्ती भागातील नेते रमेश जारकीहोळी, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती सीमावर्ती भागात आपली जादू दाखवणार असल्याचे राजकीय विश्लेषक मत व्यक्त करत आहेत.

पाच जागेवर महाराष्ट्र एकीकरण समिती रिंगणात :महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, खानापूर, यमकनमर्डी आणि निपाणी ६ मतदार संघांत उमेदवार घोषित केले होते. ही सहा मतदार बेळगाव ग्रामीणमधून युवा नेते आर एम चौगुले, बेळगाव दक्षिणमधून रमाकांत कोंडुसकर, बेळगाव उत्तरमधून अमर येळ्ळूरकर, खानापूरमधून मुरलीधर पाटील आणि यमकनमर्डीतून माजी सैनिक मारुती नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या जागांवर उधळणार गुलाल :महाराष्ट्र एकीकरण समितीने यावेळी मोठ्या चुरशीने लढा दिला आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना गुलाल उधणण्याची संधी मिळणाल आहे. यात बेळगाव ग्रामीण, बेळगाव दक्षिण आणि बेळगाव उत्तर या तीन मतदार संघात एकीकरण समितीचे पारडे जड आहे. त्यामुळे एकीकरण समिती गुलाल उधळण्याची तयारी करत आहे.

असे आहे मराठी उमेदवारांचे बलाबल :कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आपले पाच उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांनी निवडणुकीत चांगलेच तगडे आव्हान उभे केले आहे.

मराठी प्राबल्य असलेले मतदार संघ

1) बेळगाव दक्षिण मतदार संघ :

बेळगाव दक्षिण मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर आणि भाजपच्या अभय पाटील यांच्यात लढत होती. यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रमाकांत कोंडुस्कर यांचे पारडे जड मानले जात होते.

2) बेळगाव उत्तर मतदार संघ :बेळगाव उत्तर मतदार संघात काँग्रेसचे नेते आसिफ उर्फ राजू शेठ आणि भाजपच्या डॉ रवी पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे मानले जाते. या मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अमर येळ्ळूरकर यांचाही चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे या मतदार संघात चुरशीची लढत होणार आहे.

3) बेळगाव ग्रामीण मतदार संघ : बेळगाव ग्रामीण मतदर संघात काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर भाजपचे नागेश मन्नोळकर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे आर एम चौगुले यांच्यात लढत होत आहे. या मतदार संघात भाजपच्या उमेदवाराचे चांगलेच प्राबल्य असल्याची चर्चा होती.

4) यमकनर्डी मतदार संघ :यमकनर्डी मतदार संघात काँग्रेसच्या सतीश जारकाहोळी आणि भाजपच्या बसवराज हुंदरी यांच्यात लढत होती. महाराष्ट्र एकीकरण समितीचे मारुती नाईक यांचेही पारडे या मतदार संघात जड असल्याचे मानले जाते.

5) निपाणी मतदार संघ :निपाणी मतदार संघात मराठी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या मतदार संघात मराठी उमेदवारांना पहिली पसंती देण्यात आली होती. यात भाजपच्या शशिकला जोल्ले आणि काँग्रेसच्या काकासाहेब पाटील यांच्यात प्रमुख लढत असल्याचे बोलले जात होते. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे जयराम मिरजकर यांचेही तगडे आव्हान या उमेदवारांना होते.

6) खानापूर मतदार संघ :खानापूर मतदार संघात काँग्रेसच्या अंजली निंबाळकर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे मुरलीधर पाटील यांच्यात लढत होती. त्यासह भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांचाही विजयावर दावा होता.

7) कागवाड मतदार संघ :कागवाड मतदार संघात भाजपच्या श्रीमंत पाटलांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यांना काँग्रेसच्या राजू कागे यांचे तगडे आव्हान होते.

8) आरभावी मतदार संघ :आरभावी मतदार संघात भाजपचे भालचंद्र जारकिहोळ हे विजयाचे प्रमुख दावेदार मानले जातात. त्यांनी आपल्या मतदार संघात मोठा जोरदार प्रचार केला होता. तर काँग्रेसच्या अरविंद दळवाई यांनी त्यांना तगडे आव्हान उभे केले होते.

9 ) अथणी मतदार संघ :अथणी मतदार संघात मोठ्या प्रमाणात मराठी बांधव आहेत. या मतदार संघात माजी उपमुख्यमंत्री तथा भाजपचे बंडखोर नेते लक्ष्मण सावदी यांनी भाजपच्या महेश कुमठोळे यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले आहे. लक्ष्मण सावदी यांना भाजपने तिकीट न दिल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवली आहे.

हेही वाचा -

1) Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात भाजप-काँग्रेसचा बहुमताचा दावा, 'जेडीएस'ची राहील कळीची भूमिका

2) Narvekar On MLAs Disqualification : 'त्या' आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेताना कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही : राहुल नार्वेकर

3) Grand verdict of Karnataka Live Update : कर्नाटकात कमळ फुलणार की काँग्रेस जिंकणार; जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत?

Last Updated : May 13, 2023, 2:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details