महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mercury rises in Delhi: दिल्लीकरांना थंडीपासून थोडा दिलासा, तापमान वाढले.. मात्र धुक्यामुळे रस्ते, विमान, रेल्वे वाहतुकीवर परिणाम - धुक्यामुळे हवाई रेल्वे रस्ते वाहतूक संथ

Mercury rises in Delhi: मंगळवारी राजधानी दिल्लीत थंडीची लाट थोडी कमी झाल्याने दिल्लीकरांना थंडीपासून थोडा दिलासा मिळाला bringing respite from cold आहे. मात्र धुक्याच्या दाट थराने दृश्यमानता केवळ 50 मीटरपर्यंत कमी असल्याने रस्ते, विमान आणि रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला Fog delays air road rail traffic आहे. दिल्लीचे प्राथमिक हवामान केंद्र असलेल्या सफदरजंग वेधशाळेने सोमवारी ३.८ अंश सेल्सिअसच्या तुलनेत ६.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले आहे.

Mercury rises in Delhi, bringing respite from cold; Fog delays air, road, rail traffic- While Delhi witnessed cold wave conditions for five days until Tuesday
दिल्लीकरांना थंडीपासून थोडा दिलासा, तापमान वाढले.. मात्र धुक्यामुळे रस्ते, विमान, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

By

Published : Jan 10, 2023, 3:54 PM IST

नवी दिल्ली : Mercury rises in Delhi: राजधानी दिल्लीतल्या लोधी रोड आणि पालम येथील हवामान केंद्रांवर आज 6.4 अंश सेल्सिअस आणि 7.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) एका अधिकाऱ्याने सांगितले की, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील पालम वेधशाळेने 50 मीटर दृश्यता पातळी नोंदवली आहे. दिल्लीत तापमानात वाढ झाल्याने थंडी थोडी कमी झाली bringing respite from cold आहे. मात्र धुके असल्याने रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम होत Fog delays air road rail traffic आहे.

अनेक राज्यांमध्ये दाट धुके: धुक्याच्या वातावरणामुळे रेल्वेच्या ३९ गाड्या एक तास ते साडेपाच तास उशिराने धावल्या, असे उत्तर रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. सॅटेलाइट इमेजेसमध्ये धुक्याचा दाट थर उत्तर भारताच्या विस्तीर्ण भागावर कायम असल्याचे दिसून आले आहे, जो पंजाबपासून बिहारपर्यंत हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशपर्यंत पसरलेला आहे. IMD ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, "पंजाब, वायव्य राजस्थान, जम्मू विभाग, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि त्रिपुराच्या काही भागांमध्ये दाट धुके दिसले."

पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता:दिल्लीचे किमान तापमान सोमवारी ३.८ अंश सेल्सिअस, रविवारी १.९ अंश सेल्सिअस, शनिवारी २.२ अंश सेल्सिअस, शुक्रवारी ४ अंश सेल्सिअस, गुरुवारी ३ अंश सेल्सिअस आणि बुधवारी ४.४ अंश सेल्सिअस होते. पुढील २४ तासांत गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी अपेक्षित आहे. त्यामुळे पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. Delhi witnessed cold wave conditions for five days

२४ जानेवारीपर्यंत ४८ गाड्या रद्द:दिल्लीसह देशातील अनेक भागात कडाक्याची थंडी कायम आहे. दाट धुके आणि थंडीच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले. त्याचा परिणाम रेल्वेच्या कामकाजावरही दिसून येत आहे. कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये, यासाठी गाड्या कमी वेगाने चालवल्या जात आहेत. राजधानी दिल्लीहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या 30 हून अधिक गाड्या आज उशिरा आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिल्लीतून जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जेणेकरून दाट धुक्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर 2022 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान 48 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या:मागील 1 आठवड्यापासून उत्तर भारतातील डोंगराळ भागात आणि हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे राजधानी दिल्लीसह इतर राज्यांमध्ये थंडीच्या लाटेसह तीव्र थंडीचा प्रकोप दिसून येत आहे. हे टाळण्यासाठी लोक ठिकठिकाणी शेकोटी पेटवत आहेत. दिल्लीत गेल्या 2 दिवसांच्या तुलनेत मंगळवारी तापमानात थोडीफार सुधारणा नक्कीच आहे. मात्र वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि डोंगराळ भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दिल्लीत थंडी वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details