चेन्नई : चेन्नई पोलिसांना काही दिवसांपूर्वी तांबरम सॅनेटोरियम परिसरात एक मानसिक रोगी रस्त्याच्या कडेला राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे जाऊन त्या व्यक्तीला शोधून त्याची चौकशी केली असता त्याचे नाव डेव्हिड दुराईराज असून तो कोविलपट्टी वेलायुथापुरम भागातील असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी डेव्हिडची माहिती गोळा केली. त्यांना कळले की डेव्हिड २५ वर्षांपूर्वी आपले घर सोडून चेन्नईला आला होता. शहरातील विविध भागात राहून तो शेवटी तांबरम सॅनेटोरियम परिसरात स्थायिक झाला. कचऱ्यातून मिळणाऱ्या प्लास्टिक आणि लोखंडासारख्या मौल्यवान वस्तू विकून डेव्हिड आपली उपजीविका करत असे. (Mentally Disabled person reunites after 25 years). (Mentally Disabled person rescued).
मानसिक रोग्याची तब्बल 25 वर्षानंतर घरवापसी! पोलिसांनी केला कायापालट - सहाय्यक आयुक्त लोगनाथन
2004 मध्ये आलेल्या त्सुनामीत डेव्हिडचा मृत्यू झाला असावा, असे त्याच्या नातेवाईकांना वाटत होते. त्यानंतर चेन्नई पोलीस आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त लोगनाथन यांच्या उपस्थितीत पोलीस दलाने डेव्हिडची सुटका केली. बुधवारी (30 नोव्हेंबर) त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. (Mentally Disabled person rescued).(Mentally Disabled person reunites after 25 years)
![मानसिक रोग्याची तब्बल 25 वर्षानंतर घरवापसी! पोलिसांनी केला कायापालट Etv Bharat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17086059-thumbnail-3x2-chennai.jpg)
नातेवाईकांना वाटले त्सुनामीत मृत्यू झाला : त्यानंतर डेव्हिडचे फोटो वाड कोविलपट्टी पोलिस स्टेशनला तपासासाठी पाठवले. डेव्हिड दुराईराज हा कोविलपट्टी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. 25 वर्षांपूर्वी कौटुंबिक अडचणींमुळे तो बेपत्ता झाला होता. तसेच हे देखील उघड झाले की, 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीत डेव्हिडचा मृत्यू झाला असावा, असे त्याच्या नातेवाईकांना वाटत होते. त्यानंतर चेन्नई पोलीस आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त लोगनाथन यांच्या उपस्थितीत पोलीस दलाने डेव्हिडची सुटका केली. बुधवारी (30 नोव्हेंबर) त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.