चेन्नई (तामिळनाडू) :कुटुंबापासून एखादी व्यक्ती दुरावल्यानंतर त्या व्यक्तीचा शोध लागणे म्हणजे एक प्रकारे त्या व्यक्तीचा पुनर्जन्म म्हणता येईल. असाच काहीसा प्रकरा तामिळनाडूत घडला आहे. उत्तरप्रदेशातील मथुरा मधील रिशर नामक व्यक्तीची पत्नी मुबिना या महिलेने कौटुंबिक समस्यांमुळे 20 वर्षांपूर्वी घर सोडले. तेव्हापासून सुमारे 11 वर्षांपूर्वी मुपीना तामिळनाडूतील तिरुपत्थूर बसस्थानकाभोवती फिरताना आढळली. तिच्या मानसिक विकारामुळे ( Mentally affected Woman ) पोलिसांनी तिला रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मानसिक पुनर्वसन गृहात सुपूर्द केले.
Mentally affected Woman : मानसिकदृष्ट्या पीडित असलेल्या महिलेची अखेर 20 वर्षांनंतर कुटुंबासोबत भेट ... - मानसिकदृष्ट्या पीडित महिलेची कुटुंबासोबत भेट
उत्तरप्रदेशातील मथुरा मधील रिशर नामक व्यक्तीची पत्नी मुबिना या महिलेने कौटुंबिक समस्यांमुळे 20 वर्षांपूर्वी घर सोडले. तेव्हापासून सुमारे 11 वर्षांपूर्वी मुपीना तामिळनाडूतील तिरुपत्थूर बसस्थानकाभोवती फिरताना आढळली. तिच्या मानसिक विकारामुळे ( Mentally affected Woman ) पोलिसांनी तिला रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मानसिक पुनर्वसन गृहात सुपूर्द केले.

11 वर्ष पुनर्वसन केंद्रात - 11 वर्ष मुबीनाला मानसिक पुनर्वसन गृहाचे संस्थापक रमेश यांनी संरक्षण दिले. दोन आठवड्यांपूर्वी, तिरुपत्तूरचे रहिवासी असलेले आणि आग्रा येथील हवाई दलात कार्यरत असलेले अरुण कुमार आपल्या नातेवाईकाच्या वाढदिवसानिमित्त अन्न देण्यासाठी या पुनर्वसन केंद्रात आले होते.प्रसंगी मानसिक आरोग्य सेवा केंद्राचे संस्थापक रमेश यांनी अरुण कुमार यांना मुबीनाची चौकशी करण्यास सांगितले. कामासाठी आग्रा येथे परत गेल्यावर अरुण कुमारने पोलिसांना मुबीनाबाबत माहिती दिली. पोलिसांनी मुबीनाच्या कुटुंबाचा माग काढला आणि त्यांना मुबानाची माहिती दिली.
अखेर तिची कुटुंबासोबत भेट झाली - मुबिनाच्या कुटुंबातील चार सदस्य काल (28 नोव्हेंबर) तामिळनाडूतील तिरुपत्तूर येथे परतले आणि त्यांनी तिची भेट ( Woman reunite her family ) घेतली. कुटुंबीयांनी तिला मिठी मारली आणि यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघाले. कायदेशीर प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी अमरकुशवाह आणि मानसिक आरोग्य केंद्राचे संस्थापक रमेश यांनी मुबीनाला जिल्हाधिकारी कार्यालयात तिच्या कुटुंबीयांकडे मुबीना या महिलेला सुपूर्द केले. मुबीनाच्या कुटुंबीयांनी डोळ्यात अश्रू आणून सांभाळ करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.