महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 30, 2021, 10:07 PM IST

ETV Bharat / bharat

मेहुल चोक्सी गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक ट्रीपवर असावा - अँटिग्वाचे पंतप्रधान

सध्या कर्जबुडवा मेहुल चोक्सी डॉमिनिकाच्या ताब्यात आहे. 62 वर्षीय मेहुल चोक्सी 2018 ला भारतातून फरार झाल्यानंतर अँटिग्वा या देशामध्ये राहत होता. मेहुल चोक्सीला डॉमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न भारत सरकारकडून करण्यात येत आहेत. मेहुल चौक्सीविरोधातील सर्व पुरावे भारताने डॉमिनिका सरकारला सोपवली आहेत. यातच अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊनी यांनी मेहुल चौक्सीच्या अटकेसंदर्भात खळबळजनक खुलासा केला आहे.

मेहुल चोक्सी
मेहुल चोक्सी

नवी दिल्ली -पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला डॉमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न भारत सरकारकडून करण्यात येत आहेत. मेहुल चौक्सीविरोधातील सर्व पुरावे भारताने डॉमिनिका सरकारला सोपवली आहेत. यातच अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊनी यांनी मेहुल चौक्सीच्या अटकेसंदर्भात खळबळजनक खुलासा केला आहे.

मेहुल चोक्सीने चूक केली आहे. कदाचित तो आपल्या गर्लफ्रेंडबरोबर डॉमिनिकामध्ये काही चांगला वेळ घालवायला गेला असावा. मात्र, त्याला अटक करण्यात आली आहे. आता त्याला भारतात परत पाठवले जाऊ शकते, असे अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊनी यांनी एका मुलाखती म्हटलं.

सध्या कर्जबुडवा मेहुल चोक्सी डॉमिनिकाच्या ताब्यात आहे. 62 वर्षीय मेहुल चोक्सी 2018 ला भारतातून फरार झाल्यानंतर अँटिग्वा या देशामध्ये राहत होता. पीएनबी घोटाळा प्रकरणातील कागदपत्रे डॉमिनिकाला पाठवण्यात आली आहे. यासंदर्भातील सुनावणी बुधवारी होईल. मेहुल चोक्सीला भारतात नेण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असेही ब्राऊनी यांनी सांगितले.

अँटिग्वा आणि डॉमिनिका सरकारांशी भारत सरकार चर्चा समन्वय साधत असून लवकरच मेहुल चोक्सीला भारतात आणले जाईल. यासाठी भारताचे एक खास विमानही तिथे पाठवण्यात आले आहे. भारत आणि डॉमिनिकामध्ये थेट प्रत्यार्पणाचा करार नाही, तो अँटिगासोबत आहे. त्यामुळे डॉमिनिका कोर्टाचा निर्णय महत्वाचा असणार आहे. डॉमिनिका कोर्ट आता मेहुल चोक्सीला भारताच्या हवाली करायचं की परत अँटिगाला पाठवायचं याचा निर्णय घेईल.

चोक्सीकडून पीएनबीला 13,500 कोटींचा गंडा -

चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेची (PNB) 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआय त्याच्या विरोधात चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोक्सीची 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी चोक्सीचा पुतण्या नीरव मोदीनेही 2018 मध्ये भारतातून पळ काढला होता. सध्या तो युनायटेड किंग्डममध्ये आहे. पुतण्याच्या आधी काका चोक्सीला भारतात आणण्यात येईल असे दिसते. नीरव मोदीचे या प्रत्यार्पण झाल्यानंतर तो आर्थर रोडच्या व्हीआयपी बॅरेक 12 च्या विशेष सेल राहणार आहे. याच सेलमध्ये चोक्सीला ठेवण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details