महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mehndi craze : मेंदीची क्रेझ, करवा चौथसाठी बाजारपेठेत खरेदीची झुंबड - करवा चौथ खरेदी

कोरोना महामारीचा एक वाईट टप्पा संपल्यानंतर, यंदा करवा चौथ ( karva chauth festival 2022 ) सणाचा बाजारपेठांमध्ये मोठी जल्लोष पाहायला मिळत आहे. बाजारपेठांमध्ये पूर्वीप्रमाणेच यंदाही गर्दी पाहायला मिळत आहे.

Mehndi craze
मेहंदीची क्रेझ

By

Published : Oct 13, 2022, 12:21 PM IST

Updated : Oct 13, 2022, 1:39 PM IST

मुंबई : कोरोना महामारीचा वाईट टप्पा संपल्यानंतर, यंदा करवा चौथ ( karva chauth festival 2022) या सणाला बाजारपेठांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी मार्केटमध्ये महिलांची खरेदी ( women shopping in Panipat market ) पूर्वीप्रमाणेच गर्दी दिसून येत आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे.

मेकअप, कपडे, मेंदी : मेकअप, कपडे, मेंदी लावणाऱ्या दुकानांमध्ये महिलांची जोरदार खरेदी सुरू आहे. एवढेच नाही तर ब्युटीशियन ( Beautician ) आणि मेंदी कलाकारांची मागणीही वाढली आहे. दोन वर्ष कोरोना मुळे सणासुदीचा उत्साह पहायला मिळत नव्हता यावेळी मात्र बाजारात खरेदीसाठी महिला उत्साहाने आलेल्या दिसत आहे. महिला बाजारात खुलेआम खरेदी करत आहेत, खराब झालेल्या हवामानामुळे बाजारावर परीणाम झाला होता.

व्यापारीही आनंदी : बाजारात खरेदीदार वाढल्याने व्यापारीही आनंदी दिसत आहेत. व्यापाऱ्यांनी सांगितले की, कोरोना महामारीनंतर या वेळी त्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. पूर्वीप्रमाणेच आता लोक सण-उत्सवावर खरेदी करतात. काही महिला रंगीबेरंगी बांगड्यांच्या खरेदीत व्यस्त होत्या, तर काही मेहंदी लावण्यासाठी त्यांच्या आवडत्या डिझाइन्सच्या शोधात व्यस्त होत्या.

Last Updated : Oct 13, 2022, 1:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details