श्रीनगर:पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना येथील उच्च सुरक्षा असलेल्या गुपकर भागातील सरकारी बंगला रिकामा Mehbooba Mufti Bungalow करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री म्हणाल्या की, मला काही दिवसांपूर्वी फेअर व्ह्यूमधून बेदखल करण्याची नोटीस देण्यात आली. हे आश्चर्यकारक नाही आणि अपेक्षेप्रमाणे आहे. Mehbooba Mufti asked to vacate govt residence
त्या म्हणाल्या की, नोटीसमध्ये हा बंगला जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसाठी असल्याचा उल्लेख असला तरी तसे नाही. त्याचवेळी, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेहबुबा मुफ्ती यांना पर्यायी बंगल्याची ऑफर देण्यात आली आहे.