जाणून घ्या, कालच्या ( २६ डिसेंबर ) महत्त्वाच्या बातम्या-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरणास सुरूवात करण्याची घोषणा केली आहे. ते आज ( दि. 25 डिसेंबर) देशाच्या जनतेशी संवाद साधत होते. फ्रंटलाईन वर्कर्सना ( Booster Dose for Frontline Workers ) व आरोग्य कर्मचारी ( Booster Dose for Health Workers ) बूस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू करणार असल्याचेही पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) म्हणाले. सविस्तर वाचा-
- राज्याचे ऊर्जामंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत ( Nitin Raut Removed From SC Department Chairman ) यांना अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. याबाबत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून पत्रक जाहीर करण्यात आल असून, त्यांच्या जागी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार राजेश लीलोठीया ( Rajesh Lilothiya New SC Department Chairman ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के. एस. वेणुगोपाल यांनी याबाबत पत्र जारी केले आहे. नितीन राऊत यांच्या बाबतचा हा निर्णय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला असल्याची माहिती काँग्रेसकडून मिळत आहे. सविस्तर वाचा-
- नवी दिल्ली - ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येण्याची धास्ती असताना दिलासादायक बातमी आहे. भारत बायोटकची कोव्हॅक्सिन ही कोरोना लस १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना देण्याकरिता डीसीजीआयने मान्यता ( DCGI approves Covaxin for children ) दिली आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे. सविस्तर वाचा-
- जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) व त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर ( Rohini Khadse) यांच्याकडून माझ्या जिवाला धोका असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील ( MLA Chandrakant Patil Allege on Eknath Khadse ) यांनी केला आहे. सविस्तर वाचा-
- मुंबई-राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे ( MVA Govt Winter Session 2021 ) ३ दिवस पूर्ण झालेले आहेत. पुढील आठवड्यात अजून २ दिवसाचे कामकाज बाकी आहे. परंतु या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर हे सरकार ( Maharashtra State Government ) गंभीर नाही आहे. विशेष करून पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या संदर्भात हे दर ( Petrol Diesel Price Hike ) कमी करण्याबाबत राज्य सरकारला गांभीर्यच नाही आहे. म्हणून अधिवेशनानंतर या विरोधात आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला ( Devendra Fadnavis On Petrol Diesel Price ) आहे. सविस्तर वाचा-