महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली नगरपालिका पोटनिवडणूक : आपने गड राखला, तर भाजपाला धक्का

दिल्लीतील नगरपालिका पोटनिवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने पाचपैकी चार वॉर्डात तर काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला आहे. तर भाजपाला खातेही खोलता आले नाही.

By

Published : Mar 3, 2021, 12:15 PM IST

आम आदमी पक्ष
आम आदमी पक्ष

नवी दिल्ली -दिल्ली महानगरपालिकेच्या पाच मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आम आदमी पक्षाने पाचपैकी चार तर काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत भाजपा आपले खाते उघडण्यात अपयशी ठरला. गेल्या रविवारी पाच प्रभागात मतदान झाले होते. 50 टक्क्यांहून अधिक मतदारांनी महापालिकेत मतदानाचा हक्क बजावला होता.

चौहान बांगर प्रभागात काँग्रेसचे उमेदवार चौधरी जुबैर अहमद यांनी आपचे उमेदवार मोहम्मद इशराक खान यांना 10,642 मतांनी पराभूत केले. कल्याणपुरी, रोहिन-सी, त्रिलोकपुरी आणि शालीमार बागेत आपचे उमेदवार विजयी झाले. या विजयाबद्दल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी टि्वट करत कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तर नागरिक भाजपाला कंटाळले असल्याचे ते म्हणाले.

आपचे उमेदवार धीरेंद्र कुमार यांनी कल्याणपुरी प्रभागात 7,043 मतांनी विजय मिळविला. आपच्या विजय कुमार यांनी त्रिलोकपुरीमध्ये भाजपाचे ओम प्रकाश यांना 4,986 मतांच्या फरकाने पराभूत केले.

आपच्या सुनीता मिश्रा यांनी शालिमार बाग प्रभागात भाजपाच्या सुरभी जाजूचा 2,705 मतांनी पराभव केला. यापूर्वी ही जागा भाजपाच्या ताब्यात होती. आपच्या राम चंदर यांनी रोहिणी सी प्रभागात भाजपाचे उमेदवार राकेश गोयल यांचा 2,985 मतांनी पराभव केला.

आगामी वर्ष 2022 च्या सुरुवातीला 272 मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. आजचे निकालांना आगामी महानगरपालिका निवडणुकीची सेमीफायनल म्हटलं जातयं.

ABOUT THE AUTHOR

...view details