नवी दिल्ली -शाहीन बाग परिसरात ( Delhi corporation action in shaheen bagh ) अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचा बुलडोझर दाखल झाला आहे. मात्र येथून अतिक्रमण विभागाच्या पथकाला निराश होऊन परतावे ( encroachment in Shaheen bagh ) लागले. या भागातील अतिक्रमण यापूर्वीच लोकांनी हटवल्याचे सांगण्यात आले. यामुळे २४ तासांत महापालिकेला कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण काढता आले नाही. याठिकाणी बुलडोझरने एकच शटरिंग काढावे लागले. मात्र लोकांनी तेदेखील स्वतःच काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील शाहीनबाग परिसरातील ( Municipal Corporation encroachment ) अतिक्रमणाबाबत महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार होती. यासाठी दिल्ली पोलिसांकडून अनेकदा कुमक मागविण्यात ( Delhi police in Shaheen bagh ) आली. मात्र, इतर ठिकाणी बंदोबस्त असल्याने पोलिसांकडून बंदोबस्त देता आला नाही. सोमवारी एमसीडीकडून शाहीनबाग परिसरात अतिक्रमण काढण्याची ( MCD Action in Shaheen bagh ) कारवाई करण्यात आली. त्यासाठी पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांकडून फौजफाटा मागविण्यात आला. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांकडून महापालिकेला मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. यामध्ये स्थानिक पोलीस ठाण्याव्यतिरिक्त अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळी अकराच्या सुमाराला मनपा आणि पोलिसांचे पथक शाहीनबाग परिसरात अतिक्रमण काढण्यासाठी पोहोचले. मात्र येथील मुख्य रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण आढळून आले नाही. महापालिकेची कारवाई पाहण्यासाठी परिसरातील नेतेही येथे उपस्थित होते. खुद्द आमदार अमानतुल्ला खान हेही दुकानदारांच्या समर्थनार्थ येथे उभे राहिले. सुमारे २ तास येथे बुलडोझर उभा होता. मात्र त्यांना कोणतेही अतिक्रमण आढळून आले नाही. यादरम्यान मनपाच्या अधिकाऱ्यांनी एका दुकानाबाहेर रंगकाम करण्यासाठी लावलेले शटर बेकायदा अतिक्रमण असल्याचे सांगितले. त्याला बुलडोझरने ते हटवायचे ( Bulldozer return from shaheen bagh ) होते. मात्र लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी स्वतः शटरिंग काढले.